Tanvi Kolte on Kokan Gauri Aagman अभिनेत्री तन्वी कोलते मूळची कोकणातीलआहे. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.त्या व्हिडीओमध्ये तिने कोकणात गौरी आणण्याची कशी पद्धत आहे, याबद्दलची माहिती दिली आहे.
तन्वी कोलतेने शेअर केला व्हिडीओ
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, तन्वीने सुंदर साडी नेसली आहे. तिच्या हातात एक ताट आहे, ज्यामध्ये कलश आहे. तसेच लाल कपडा आणि इतर साहित्यही पाहायला मिळत आहे. कलशामध्ये पाने आणि फुले दिसत आहेत. तिच्याबरोबर इतरही लोक आहेत.
तन्वी नदीजवळ जाते. तेथील पाणी कलशात घेते. त्यानंतर तिच्याबरोबरचा लहान मुलगा तिला नदीच्या पात्रातील छोटे खडे देतो. त्यानंतर तन्वी कलश एका खडकावर ठेवते. त्याच्यासमोरील जागा पाण्याने पुसते आणि ते खडे ओळीने मांडते. त्याला हदळी-कुंकू लावते. त्यावर फुले वाहते. त्याच्यासमोर छोटीशी रांगोळी काढते. त्यानंतर तो लाल कपडा कलशाला बांधला जातो.
व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, तन्वी विड्याची पाने व सुपारी, प्रसाद ठेवते. अगरबत्ती लावते. त्यानंतर आरती केली जाते. मग तन्वी विड्याची पाने पाण्यात सोडून देते. तेथील इतर महिलांना ती हळदी-कुंकू लावते. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. त्यानंतर ती कलश कपाळाला टेकवून आशीर्वाद घेते. निघण्याआधी ती तेथील पाणी पिते. त्यानंतर टाळ, घंटी व डमरू वाजवत गौरी घरी आणली जाते. घरी आल्यानंतर गौरीला हळद-कुंकू लावले जाते आणि आरती केली जाते.
हा व्हिडीओ शेअर करताना तन्वीने, ‘आमच्या कोकणातील गवर आणायची पद्धत’, अशी कॅप्शन दिली आहे. तन्वी या व्हिडीओमध्ये मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिने साडी नेसली असून, नाकात नथ घातली आहे. केसांत गजरा माळला आहे. तसेच, मोजके दागिने घातले आहेत. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे.
आता तन्वीच्या या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, “वाह”, दुसऱ्या एकाने लिहिले, “नवसाची गौराई माझी”, आणखी एकाने लिहिले, “सुंदर गौराई”, एकाने लिहिले, “आपल्या गावाकडील प्रथा आणि सौंदर्य जपणारी माणसं कोकणातीलच”, एकाने लिहिले, “तू खूप सुंदर दिसत आहेस”, आणखी एकाने लिहिले, “किती गोड दिसतेस”, अशा अनेक कमेंट्स करrत नेटकऱ्यांनी तन्वीचे कौतुक केले आहे.
दरम्यान, तन्वी कोलते सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच ती एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
