scorecardresearch

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘जेठालाल’च्या जीवाला धोका; अभिनेत्याच्या घराबाहेर वावरत आहेत गुंड

सध्या दिलीप जोशी यांचा जीव धोक्यात असल्याची बातमी समोर आली आहे

dilip joshi jethalal
फोटो : इंडियन एक्सप्रेस

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत.

सध्या दिलीप जोशी यांचा जीव धोक्यात असल्याची बातमी समोर आली आहे. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार दिलीप जोशी यांच्या घराभोवती तब्बल गुंड घुटमळताना आढळले आहेत. मीडिया रीपोर्टनुसार त्या गुंडांच्या हातात हत्यारं असल्याचंही स्पष्ट झालं आहे. एका अनोळख्या व्यक्तीने ही बातमी नागपूर पोलिस कंट्रोलला दिल्यावर पोलिसही सावध झाले आणि त्यांनी दिलीप दोषी यांना सांभाळून राहायचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : ‘मैं हूं ना’मध्ये केवळ एका सेकंदाच्या कॅमिओसाठी तब्बू कशी तयार झाली? फराह खानने केला खुलासा

आपल्याला अभिनयातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या जीवावर कोण उठलं आहे यामुळे त्यांचे चाहते चिंतित आहेत. नागपूर पोलीस कंट्रोल रूमला एका फोन कॉलच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती. १ फेब्रुवारीला हा फेक कॉल आला असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अज्ञात व्यक्तीने केवळ दिलीप जोशीच नव्हे तर बॉलिवूडचे महानयाक अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनाही जीवेमारण्याची धमकी दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ गुंड हत्यारं आणि बॉम्ब घेऊन वावरत असल्याचं या कॉलमधून समोर आलं आहे. पोलिसांनी आता या मोठ्या सेलिब्रिटीजना सुरक्षा द्यायला सुरुवात केली आहे. या सगळ्या सेलिब्रिटीजना सावधानतेचा इशारा तर दिलाच आहे पण उद्योगपती मुकेश अंबानी यांना पोलीसांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. आता इतरही कलाकारांनाही अशीच सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांचे चाहते करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 12:38 IST