Abhidnya Bhave On Anant Jog: अनंत जोग यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही ते विविध मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

आता तारिणी मालिकेत त्यांची एन्ट्री पाहायला मिलाली. या मालिकेत त्यांनी राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारली आहे. बापुराव जामखंडे हे कौशिकच्या न्यूज चॅनेलवर मुलाखतीसाठी येणार असतात. पण नेमकी कौशिकी त्यादरम्यान आजारी पडते. त्यानंतर केदारने ही मुलाखत घ्यावी असे ठरते.

अनंत जोग यांच्याबद्दल अभिज्ञा भावे म्हणाली…

मालिकेत कौशिकी ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावेने साकारली आहे. आता नुकतीच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनंत जोग यांच्याबरोबर काम करण्याबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली, “मला जेव्हा कळलं की अनंत दादा जामखंडेचं भूमिका साकारणार आहेत. तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला की माझे सीन आहेत का? किंवा आम्ही एकमेकांशी बोलतोय असे काही सीन आहेत का? त्यावर मला सांगितलं गेलं की तुम्ही एकमेकांशी बोलताय असे काही सीन नाहीत. त्यावेळी मला वाईट वाटलं. पण, मला ही गोष्ट जाणवली की माझ्या मनात भीती आहे. ही गोष्ट मला सेटवर आल्यावर जाणवली.”

अभिज्ञा भावे पुढे म्हणाली, “मी जेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाहिलं, तेव्हा माझ्या मनात विचार होता की या माणसाच्या डोळ्यात बघून जर आत्मविश्वास दाखवू शकलीस, तर तू जग जिंकलीस. त्यांनी आजपर्यंत अशी पात्रे साकारली आहेत. ते जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचा ऑराच खूप स्ट्रॉंग आहे की त्यांच्यासमोर टिकून राहणे हा मोठा टास्क आहे. मला त्यांच्याबरोबर सीन करायचे होते. पुढे-मागे कधीतरी आमचे एकत्र सीन असावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. पण, मी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करतेय याचा मला आनंद आहे.”

पुढे ती म्हणाली, “मी कधी असा विचारही केला नव्हता की मी त्यांच्या आजूबाजूला असेन किंवा त्यांचा मला पाच मिनिटांचा सहवासही मला मिळेल”, असे म्हणत अभिज्ञाने अनंत जोग यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली, याचा आनंद व्यक्त केला.

तारिणी मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राइम युनिटचा भाग आहेत. ती त्यांची ओळख लपवून काम करतात. ते दोन आयुष्ये जगतात. इतर वेळी ते सामान्यांप्रमाणे वागतात, बोलतात. त्यांची ओळख समोर येऊ नये, म्हणून प्रयत्न करतात. निष्पाप लोकांवर संकट आल्यानंतर ते त्यांच्या जीवाची पर्वा न करता काम करतात.

सध्या ते खांडेकर कुटुंबात नवरा- बायको म्हणून राहत आहेत. युवराजला केदार आणि तारिणीला घराबाहेर काढायचे आहे, त्यामुळे तो सतत त्यांच्याविरुद्ध कट-कारस्थाने करतो, त्यांना अडचणीत टाकतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.