Zee Marathi Tarini Serial : तारिणी आणि तिच्या टीमने काही दिवसांपूर्वीच युवराजने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीवर रेड मारली. ‘तारिणी’ टीमने योग्य प्लॅनिंग करून गुलाबला आपल्या ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तारिणी गुलाबला दिवसरात्र टॉर्चर करून त्याच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय. पण, काही केल्या गुलाब तारिणीला तिच्या आईबद्दलच्या कोणत्याच गोष्टी सांगत नसतो.
शेवटी तारिणी गुलाबबरोबर एक माइंड गेम खेळते. परदेशात राहणाऱ्या गुलाबच्या मुलीची सगळी माहिती तारिणीकडे असते. आपल्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होईल या भीतीने गुलाब सगळ्या गोष्टी सांगण्यास तयार होतो. तसेच पुढच्या २४ तासांत या संपूर्ण केसचा तपास CBI कडे सोपवण्यात येणार असतो. त्यामुळे साहजिकच गुलाबची कस्टडी सुद्धा CBI ला देण्यात येते.
गुलाब जाता-जाता तारिणीला एक मोठी हिंट देणार आहे. “वसुधा बेलसरे…तुझ्या आईला मी मरताना पाहिलंय. पण, तिला मारणारा मी नाहीये. वसुधा बेलसरेला मारणारी व्यक्ती फार लांब नाहीये, इथेच आजूबाजूला आहे. तुझ्यात हिंमत असेल तर पकड त्या व्यक्तीला…” यानंतर तारिणीचा संताप अनावर होतो…ती थेट गुलाबचा गळा धरते आणि त्याच्यावर बंदूक रोखते.
शेवटपर्यंत गुलाब त्या व्यक्तीचं नाव तारिणीला सांगत नाही. पण, यावरून या सगळ्याचा मास्टरमाईंड दुसराच कोणीतरी आहे हे अगदीच स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या खेळात गुलाब आणि युवराजपेक्षा एक मोठा व्हिलन आहे…जो लवकरच प्रेक्षकांसमोर येईल.
नेटकऱ्यांनी तारिणी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव करत त्या मास्टरमाईंडचं नाव गेस केलं आहे. काही लोकांनी कौशिकी आणि दयानंद खांडेकरचं व्हिलन म्हणून नाव घेतलंय. पण, नेटकऱ्यांचा सर्वाधिक संशय सध्या डॉ. कामतवर आहे. ज्याप्रकारे डॉ. कामत यांनी कौशिकीकडे गुलाब प्रकरणाची चौकशी केलेली असते. यावरून यामागे डॉ. कामत व्हिलन असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हा विशेष भाग येत्या ९ जुलैला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘तारिणी’ मालिका झी मराठीवर रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.
