Tarini upcoming twist: ‘तारिणी’ या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट येत आहेत. काही दिवसांपूर्वी साधू सरांची बदली झाली आणि त्याजागी जेजे ही पोलीस ऑफिसर आली. स्पेशल क्राइम युनिट आता तिच्या अंतर्गत काम करते. जेजेने अचानक खांडेकरांच्या घघरात जाऊन युवराजला अटक केली आणि त्यासाठी युवराज व गुंड गुलाब यांचा संबंध होता, या तारिणीकडून मिळालेल्या जबाबाची जेजेला मदत झाली.
युवराजला जेजे सोडणार नाही असे वाटत असतानाच पुराव्यांअभावी सोडले आहे, असे म्हणत युवराजची सुटका केली. मात्र, या सगळ्यात तारिणी आणि केदारला मात्र वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. आता युवराज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने केदारला सांगितले की न्यूजमध्ये त्याच्या निर्दोष असण्याबद्दल सांगितल पाहिजे.
तारिणी व तिची टीम गेल्या अनेक दिवसांपासून गुलाबचा बॉस कोण आहे, याचा शोध घेत होती. आता गुलाबचा बॉस सगळ्यांसमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“हे सगळं करण्याची माझी काही इच्छा…”
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तारिणी मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की तारिणी व केदार एकमेकांशी बोलत आहेत. केदार तारिणीला म्हणतो, “हे सगळं करण्याची माझी काही इच्छा नव्हती. मला जर परवानगी असती तर मी जगाला ओरडून सांगितले असते की युवराज खांडेकर हा….”, केदारचे वाक्य पूर्ण होण्याआधीच खांडेकर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर कामत तिथे येतात आणि म्हणतात, “म्हणजे हे तू सगळं मनापासून केलं नाहीस. आतून तुला अजूनही वाटतंय की युवराज हा गुन्हेगार आहे. तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींपासून लांबच राहा.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की युवराजच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरुन फोन येतो. तो कोण बोलतंय असे विचारतो. त्याला उत्तर मिळते, “गुलाब गेला पण, हा खेळ संपला नाही. फोन ठेवल्यानंतर युवराज स्वत:शीच बडबड करत म्हणतो, “खरंच गेम लेव्हल अप झालाय. युवराज आता तुझी गुलाबच्या बापाशी भेट होणार आहे.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस”, अशी कॅप्शन दिली आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. डॉक्टर कामत मास्टरमाइंड आहे, असे अनेकांनी लिहिले आहे. तर अनेकांनी युवराज ही भूमिका साकारणाऱ्या प्रशांत केनीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
