Tarini upcoming twist: ‘तारिणी’ मालिकेत दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. जे जेची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली होती. ती आल्यानंतर स्पेशल क्राइम युनिटला ती मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात वेगळे घडले. ती लाच घेऊन काम करत असे. शेवटी तर तिने स्पेशल क्राइम युनिटची ओळख सर्वांसमोर आणण्याचे कारस्थान केले होते. मात्र, ते तिच्यावरच उलटले.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जे जेचे सत्य स्पेशल क्राइम युनिटसमोर आले आहे. तिने युवराजला सोडण्यासाठी पद्मिनी खांडेकरकडून पैसे घेतले होते. तसेच, टीम तारिणीचा घातपात करण्याचा तिचा विचार होता. तिच्या घरात मोठ्या प्रमाणात सोने आणि पैसे सापडले होते.

“जे जे यांचे एसीएच कंपनीमध्ये शव…”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जे जे आणि स्पेशल क्राइम युनिटचा आमना सामना झाल्याचे पाहायला मिळाले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये पद्मिनी खांडेकरला जाळ्यात अडकवण्यासाठी तारिणी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रोमोमध्ये पाहायला मिळते की खांडेकरांच्या घरी टीव्ही सुरू आहे. त्यावर न्यूज चॅनेल लावले आहे. त्यावर बातमी सांगण्यात येते, “जे जे यांचे एसीएच कंपनीमध्ये शव आढळलं आहे. जया जगदाळे यांच्या घरून करोडो रुपये जप्त केल्याचे सांगितले जात आहे.” ही बातमी पाहून खांडेकरांच्या कुटुंबातील सर्वांना धक्का बसल्याचे दिसत आहे, तर पद्मिनी खांडेकरच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे.

ही बातमी पाहिल्यानंतर दयानंद खांडेकर म्हणतात, “या अशा असतील असं वाटलं नव्हतं”, त्यावर डॉक्टर म्हणातात, “ही सगळी माणसं ना उजळ माथ्याने समाजात वावरतात.” तारिणी म्हणते, “एवढे पैसे घेतले म्हणजे त्यांनी खूप लोकांकडून पैसे घेतले असतील, हो ना पद्मिनी काकू?” तारिणीच्या प्रश्नाने पद्मिनीच्या चेहऱ्यावर भीती वाटत असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पद्मिनी अडकणार का तारिणीच्या जाळ्यात?”, अशी कॅप्शन दिली आहे.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिकेत जे जे हे पात्र अभिनेत्री मानसी कुलकर्णीने साकारले आहे. आता प्रोमोवरून जे जे हे पात्र संपले असल्याने अभिनेत्रीची मालिकेतून एक्झिट झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.