Tarini upcoming twist: ‘तारिणी’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तारिणीची वरिष्ठ अधिकारी जे जे म्हणजेच जया जगदाळे स्पेशल क्राइम युनिटविरुद्ध कारस्थान करीत असल्याचे दिसत आहे. आता मात्र टीम तारिणी तिच्यावर भारी पडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे.

जेजेचा प्लॅन तिच्यावरच उलटला

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जेजेला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. त्याचा उल्लेख ती मास्टरमाईंड, असा करते. त्याने तिला टीम तारिणी म्हणजे स्पेशल क्राईम युनिटबद्दल माहिती विचारली. तसेच, घातपात करण्यासाठी तिची मदत मागितली. त्यासाठी तिला पैसे देण्याचे कबूल केले. तारिणीच्या टीममधील कमांडरला तिने स्वत:च्या बाजूला वळवले आणि टीमला चुकीची माहिती द्यायला लावली. त्यांना अशा एका ठिकाणी पाठवले, जिथे त्यांच्यावर हल्ला केला जाऊन, त्यांना जीवे मारले जाऊ शकते. मात्र, आता तिचा प्लॅन तिच्यावरच उलटल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जेजे स्वत:शीच म्हणते, “टीम तारिणी, प्रामाणिकपणा करून शहीद होण्याची फार हौस आहे ना तुम्हाला? तुमच्या शहीद होण्याची जेजेला भरघोस किंमत मिळणार आहे.” त्यानंतर जेजे ज्या ठिकाणी स्पेशल क्राईम युनिटला बोलावले गेलेले असते, तिथे पोहोचते. तिथे तिला कोणीही दिसत नाही. ती मास्टरमाईंडला फोन करते आणि म्हणते की, तुमची माणसं कुठे आहेत?” तितक्यात तिला बंदूक चालवल्याचा आवाज येतो. ती त्या दिशेने जाते.

जेजे ज्या ठिकाणी जाते, तिथे केदार येतो आणि तिला म्हणतो, “टीम तारिणीला शेवटचा श्वास घेताना बघायचं होतं ना; सगळे तुमच्या मागे आहेत.” त्याला पाहून जेजेला धक्का बसतो. ती त्याला म्हणते, “केदार तू?” त्यानंतर संपूर्ण टीम तिथे येते. तारिणी म्हणते, “जेजे जे बोलते, ते ते करते, बरोबर ना?” तिचे बोलणे ऐकून आणि स्पेशल क्राईम युनिटला समोर पाहून जेजेच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘टीम तारिणी करणार जेजेचा The End’, अशी कॅप्शन दिली आहे.

तारिणी मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत प्रोमोचे कौतुक केले आहे. “ही मालिका पाहताना कधीच कंटाळा येत नाही”, “वाह! आता मजा येणार”, “मला माहीत आहे की, हेच होणार होतं. तारिणी फक्त जिंकण्यासाठीच जन्माला आली आहे”, “टीम तारिणीला संपवणं, सोपं वाटलं का जेजे मॅडम, ती टीम तारिणी आहे, दुष्टांचा नाश करणारी”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी मालिकेचे कौतुक केले आहे.

दरम्यान, मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.