Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’ मालिकेत फक्त घरातील भांडणे पाहायला मिळत नाहीत, तर मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीनही पाहायला मिळतात. कुटुंबाप्रती असणारे प्रेम, नातेसंबंध चांगले रहावेत यासाठी केलेले प्रयत्न; याबरोबरच गुंडांशी होणारी मारामारी, गुन्हेगार शोधून काढण्यासाठी दाखवलेले धाडस, तसेच निरागस लोकांना त्रास देणाऱ्यांना दिलेली शिक्षा अशा अनेक गोष्टी या मालिकेत पाहायला मिळतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे ‘तारिणी’ मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.
सध्या ‘तारिणी’ मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. तारिणी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन तिरंगासाठी अमृतसरला गेली आहे. ती स्पेशल क्राइम युनिटमध्ये काम करत असल्याने आणि ऑपरेशन तिरंगाची माहिती काही मोजक्या लोकांना असल्याने तारिणीच्या कुटुंबाला याबद्दल काहीही माहिती नाही. ती कुठे गेली आहे, ती परत येणार की नाही याबद्दल त्यांना काहीही कल्पना नाही. अगदी तिच्या युनिटलाही याबद्दल काही कल्पना नाही.
तारिणीचा दहशतवादी संघटनेत प्रवेश
ऑपरेशन तिरंगासाठी तारिणी अमृतसरला गेली आहे. तिथे ती एका दहशतवादी संघटनेत सामील झाली आहे. ती तिथे सलमा या नावाने वावरत आहे. दहशतवादी संघटना जीवितहानी करण्याची योजना आखत आहे. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. झी मराठी वाहिनीने ‘तारिणी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तारिणीचे वरिष्ठ अधिकारी तिला एक डिव्हाइस देतात आणि सांगतात, “हे डिव्हाइस शत्रूच्या सेफहाऊसमध्ये प्लँट कर, म्हणजे आपल्याला रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील.” तारिणी ज्या दहशतवादी संघटनेत राहत आहे, तिथे ते डिव्हाइस लावते. ते लावत असताना तिच्या हातातून एक वस्तू खाली पडते. त्या आवाजाने तेथील एक महिला तिथे येते आणि तिला विचारते, “सलमा यहाँ क्या कर रही हो?” त्यावर तारिणी म्हणते, “नींद नहीं आ रही थी”, तारिणीच्या ऑफिसमध्ये एक महिला अधिकारी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगते की, सर जीपीएस ट्रॅकर आणि ऑडिओ डिव्हाईस अॅक्टिव्ह झालेला दिसत आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, दहशतवादी संघटनेचा मुख्य तेथील महिलांना म्हणतो, “हमें बेहद रश्क होता हैं आपसे, आप सबको खुद पर फक्र करना होगा, कौम के लिए मिलने वाली तमाम नस्लो की वजह आप हो”, बसलेल्या महिलांपैकी एक वय कमी असलेली मुलगी त्याला म्हणते, “आप बस कहिए जनाब, कितनी जाने लेनी है?” ते ऐकल्यानंतर तारिणी मनातल्या मनात निर्धाराने म्हणते, “मी यांचे इरादे सफल होऊ देणार नाही.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एक नवं पाऊल, एक नवं आव्हान…सुरू होणार ऑपरेशन तिरंगाचा नवा अध्याय”, अशी कॅप्शन लिहिली आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
