scorecardresearch

Premium

तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने टीआरपीत मारली बाजी, ‘ठरलं तर मग’ मालिकेला टाकलं मागे, पाहा संपूर्ण यादी

‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’ अन्…; टीआरपीच्या शर्यतीमधील टॉप ५ मालिका कोणत्या? जाणून घ्या…

premachi goshta trp list
प्रेमाची गोष्ट मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी

स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकांना सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेले अनेक महिने जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होती. परंतु, या आठवड्याच्या टीआरपी शर्यतीत तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने बाजी मारली आहे.

हेही वाचा : “‘मन्नत’मध्ये पाली आहेत का?”, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला…

Sahkutumb Sahaparivar fame sakshee gandhi
Video: ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधी लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा प्रोमो
apurva nemlekar
“तुमची मुलगी आहे का?” चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरने दिले उत्तर, म्हणाली…
madhuranii
“हिला स्वतःची पोरं सांभाळता आली नाहीत आणि…”, ‘आई कुठे काय करते’च्या ट्रॅकमुळे प्रेक्षक हैराण, नाराजी व्यक्त करत म्हणाले…
usha nadkarni sushant singh rajput
“कितीही पैसे दाबून…”, सुशांतच्या आत्महत्येवर उषा नाडकर्णींची भावूक प्रतिक्रिया, म्हणाल्या “देव योग्य वेळी…”

तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अवघ्या दोन आठवड्यात टॉप १० मालिकांच्या यादीत स्थान मिळवलं होतं आणि आता तिसऱ्या आठवड्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने या आठवड्याचं टीआरपी रेटिंग तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

हेही वाचा : अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’, ‘ठरलं तर मग’ या मालिका टीआरपीमध्ये सातत्याने आघाडीवर असतात. यामध्ये आता ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा समावेश झाला आहे. तेजश्रीने शेअर केलेल्या पोस्टनुसार, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ६.८ टीआरपीसह पहिल्या स्थानी, ‘ठरलं तर मग’ ६.७ टीआरपीसह दुसऱ्या स्थानी, तर ६.५ टीआरपीसह ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा : “त्यांनी मला मारलंच असतं…”, अभिनेत्री होण्याआधी प्रार्थना बेहरे होती पत्रकार, संजय दत्तला विचारलेला ‘तो’ प्रश्न, म्हणाली…

पहिल्या तीन मालिकांनंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी अनुक्रमे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘आई कुठे काय करते’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिका आहेत. विशेष म्हणजे, मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपी यादीत पहिल्या १० स्थानावर स्टार प्रवाहच्या मालिका आहेत.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळेसह शुभांगी गोखले, योगेश केळकर, संजीवनी जाधव, इरा परवडे आणि अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tejashree pradhan premachi goshta serial beats tharala tar mag in online trp rating sva 00

First published on: 23-09-2023 at 17:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×