Tejashri Pradhan AI Photo : गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर ८० च्या दशकातील AI फोटो ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हे फोटो चॅटजीपीच्या मदतीने तयार केले जात आहेत. AI मध्ये ८० च्या दशकातील लूक, कपड्यांची स्टाइल, मेकअप, हेअरस्टाइल, फोटोची क्वालिटी अगदी हुबेहूब बदलली जातेय. मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच हा ट्रेंड फॉलो केल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी स्टार क्रिकेटपटूंनी सुद्धा त्यांचे फोटो AI द्वारे रिक्रिएट केल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने शेअर केलेला रेट्रो लूकमधील AI फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मालिकाविश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिने शेअर केलेला रेट्रो लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तेजश्री या लूकमध्ये अगदी सेम टू सेम श्रीदेवींसारखी दिसतेय, अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
तेजश्रीने या फोटोला “Time travel looks good on me” असं कॅप्शन दिलं आहे. मोठा चष्मा, कर्ली हेअर्स, मोरपिशी रंगाचा ड्रेस अशा स्टाइलमध्ये तिचा हा AI रेट्रो लूक पाहायला मिळतोय. तेजश्रीच्या फोटोवर गौरव मोरेने फायर इमोजी देत खास कमेंट केली आहे. तर, अभिनेत्री शर्मिला शिंदे म्हणते, “ओह माय गॉड”
याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आमची क्वीन तेजश्री”, “सुंदर…तेजू तू नेहमीच छान दिसतेस”, “ओह माय गॉड तेजश्री मॅमचा रेट्रो लूक खरोखरच जबरदस्त आहे”, “अगदी श्रीदेवीसारख्या दिसत आहात मॅम”, “सेम श्रीदेवी”, “ती तेव्हा काय करायची”, “तुम्ही श्रीदेवी सारख्या दिसताय”, “तेजू ताई हेअरस्टाइल खूप भारी रिक्रिएट झालीये” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.
