Tejashri Pradhan shares photo: प्रत्येकजण वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. कोणी आपल्या कुटुंबाबरोबर, मित्र-मैत्रीणींबरोबर हा खास दिवस साजरे करते, तर कोणी स्वत:साठी वेळ काढून दररोजच्या आयुष्यापासून थोडे दूर जात हा खास दिवस साजरा करते. काहीजण निसर्गात रमते तर काहींना पार्टी आवडते. त्यामुळे आपले खास दिवस साजरे करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.
त्यामुळेच आपले आवडते कलाकार त्यांचे वाढदिवस कसे साजरे करतात, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारदेखील सोशल मीडियावर फोटो, पोस्ट, व्हिडीओ शेअर करत त्यांच्या खास गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करतात. त्यांच्या संपर्कात राहतात.
तेजश्री प्रधानचा नुकताच वाढदिवस झाला. या निमित्ताने फक्त चाहत्यांनीच नाही तर कलाकारांनीदेखील तिच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. अगदी अंकुश चौधरी, शिवानी बावकर, वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील तिची सह कलाकार पूर्णिमा डे या आणि अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या. तिच्याबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त केले. अनेक चाहत्यांनीदेखील विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत तिचा हा खास दिवस साजरा केला. सोशल मीडियावर जरी तेजश्रीला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या गेल्या. तेजश्री मात्र ट्रीपसाठी गेली आहे. तिथील काही मोजके फोटो तिने शेअर केले होते.
तेजश्री प्रधानने ‘असा’ साजरा केला वाढदिवस
आता तेजश्रीने एक फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यंत साध्या पद्धतीने तिने तिचा वाढदिवस साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत तिने डोळे मिटून हात जोडल्याचे दिसत आहे. ती प्रार्थना करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्यासमोर एक केक आहे. तसेच, त्यावर हॅपी बर्थडे तेजू असे लिहिले आहे. तेजश्रीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहेत. तसेच, तिने केसात एक छोटेसे फूल लावल्याच्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की मी अजूनही मला मिळालेले आशीर्वाद मोजत आहे. तसेच, पुढे तिने कृतज्ञ असल्याचे लिहिले.
तेजश्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर होणार सून मी या घरची या मालिकेतून तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर विविध भूमिका साकारत मालिकांसह चित्रपटांत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. तिने या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. तिच्या मालिकेला, तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
