Tejashri Pradhan Elegant Look : ‘झी मराठी’ वाहिनीने जवळपास महिन्याभरापूर्वी पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली. सध्या वाहिनीवर सुरू असणाऱ्या दैनंदिन मालिकांचा तसेच कथाबाह्य कार्यक्रमांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो. मुख्य पुरस्कार सोहळ्यापूर्वी नामांकन सोहळा पार पडतो. या सोहळ्यात नॉमिनेशन्स जाहीर केले जातात. ‘झी मराठी’चा हा नामांकन सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला. प्रेक्षकांचे लाडके कलाकार हटके अन् सुंदर लूक करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
मात्र, या सगळ्यात तेजश्री प्रधानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तेजश्री सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदीची मुख्य भूमिका साकारतेय. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी स्वानंदी अगदी सुंदर लूक करून रेड कार्पेटवर अवतरली होती.
फिकट जांभळा आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाचं कॉम्बिनेशन असलेली सुंदर फ्रील साडी, डोळ्यांना ग्लिटर, पायात साडीला मॅचिंग होतील असे क्रॉक्स शूज, हातात छानसं ब्रेसलेट, मॉडर्न कमरपट्टा आणि गोल्डन कानातले या लूकमध्ये तेजश्री खूपच सुंदर दिसतेय. हा लूक कॅरी करताना तेजश्रीने केस मोकळे ठेवलेत.
तेजश्रीचे या लूकमधील फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे कॅमेऱ्यासमोर येताच ती गोड हसलीये, त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
“सुंदर सुंदर वो हसीना बड़ी…सुंदर सुंदर”, “तेजश्रीने एन्ट्री घेतली मग विषय संपला…किती गोड दिसतेय”, “जस्ट वॉव…सिंपल पण सुंदर लूक”, “तेजू ताई काय मस्त दिसतेस”, “स्वानंदी आणि तिचं साडी प्रेम”, “नॉमिनेशन सोहळ्याच्या थीमला न्याय दिलाय स्वानंदी मॅडमनी”, “ग्लॅम लूक Nailed It”, “वॉव स्वानंदी” अशा असंख्य प्रतिक्रिया तेजश्री प्रधानच्या रेड कार्पेट एन्ट्रीच्या व्हिडीओवर आल्या आहेत.
