Tejashri Pradhan New Look : मराठी मालिकाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तेजश्रीने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेत्री ‘झी मराठी’च्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारताना दिसतेय.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील स्वानंदी स्वभावाने खूपच साधी, सर्वांचा आदर करणारी, आपलं घर जपणारी असते. यामुळेच मल्लिका तिच्याविरोधात अनेक कारस्थानं रचताना दिसतेय. आता स्वानंदी लवकरच मल्लिकाचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड करणार आहे. स्वानंदी या पात्राच्या स्वभावानुसार मालिकेत तेजश्री एकदम सिंपल लूकमध्ये दिसते. समरशी लग्नहोण्याआधी स्वानंदी ड्रेस-ओढणी, कपाळावर लहानशी टिकली, एका हातात घड्याळ अन् दुसऱ्या हातात सिंगल कडा या लूकमध्ये दिसायची.

तर, राजवाडेंची सून झाल्यावर स्वानंदी साडीलूकमध्ये पाहायला मिळतेय. दैनंदिन मालिकेत काम करणारे कलाकार त्यांच्या पात्रांनुसार वेशभूषा साकारत असतात. अनेक कलाकार पडद्यावर साध्याभोळ्या भूमिका साकारतात पण, खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस असतात. पण, तेजश्री एवढी वर्षे प्रेक्षकांना ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन सारख्याच लूकमध्ये दिसत होती.

Award Banner

मात्र, आता पहिल्यांदाच तिने ऑफस्क्रीन नेहमीपेक्षा वेगळा लूक केला आहे. तिच्या या सुंदर लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्री प्रधान या नव्या वर्षात नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेली आहे. तिने काहीशी हटके हेअरस्टाइल केल्याचं पाहायला मिळत आहे.

तेजश्री आपल्या नव्या लूकच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “एका वेगळ्या हेअरकटद्वारे मी एक वेगळा दृष्टीकोन मिळवण्याचा प्रयत्न करतेय #नवीनवर्ष #HappyLife” नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“सुंदर लूक”, “वॉव न्यू लूक”, “क्युटनेस ओव्हरलोड”, “किती गोड आहे फोटो”, “मस्त काहीसा वेगळा लूक मला हा लूक आवडला”, “सिंड्रेला दिसतेय”, “आमची नॅचरल ब्युटी”, “एकदम गोड अशीच हसत राहा” अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, तेजश्री प्रधान प्रमुख भूमिका साकारत असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका रोज संध्याकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते. यामध्ये तेजश्रीसह अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकत आहे.