‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरचं नातं आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. दोघांमध्ये प्रेमाचं नातं बहरताना दिसत असून दोघांची जवळीक वाढली आहे. अशातच मिहिर सागरला सांगतो, प्रेमाची खरी सुरुवात किसपासून होते आणि मग प्रेमाची सुरुवात करण्यासाठी सागर मुक्ताला आज किस करताना पाहायला मिळणार आहे.

आजच्या भागामध्ये लग्नानंतर पहिल्यांदाच सागर मुक्ताला गालावर किस करताना दिसणार आहे. एवढंच नव्हेतर किस केल्यानंतर तो मुक्ताला एक चॅलेंज देणार आहे. “मी दिलेली ही गोष्ट माझ्या बायकोकडून परत हवीये मला,” असं सागर म्हणतो आणि निघून जातो. पण यामुळे मुक्ताला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिला काही कळतं नाही. तितिक्यात इंद्रा येते. तिला आवरायला सांगते. पण तरीही मुक्ताचं लक्षचं नसतं.

Who is Trishla Chaturvedi
“आमच्यासमोर नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केली म्हणून ४५ दिवस गोमूत्र-शेण खाल्लं”, हा दावा करणाऱ्या त्रिशला चतुर्वेदी कोण आहेत?
detailed map of Ram Setu
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखाली असलेल्या रामसेतूचा पहिला नकाशा
trade and technology farmers marathi news
शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!
Chip design pioneer and transgender activist Lynn Conway
चिप-चरित्र : ‘व्हीएलएसआय क्रांती’कारक लिन कॉनवे
The flood came in wedding hall but people enjoyed food
भूक महत्त्वाची! भरमंडपात आला पूर, तरीही गुडघाभर पाण्यात लोकांनी घेतला मेजवानीचा आस्वाद; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आधी जेवण बाकी…”
India light tanks designed for mountain war with China
विश्लेषण : चिनी सैन्याविरोधात उत्तुंग पर्वतीय क्षेत्रात रणगाडा प्रभावी ठरेल?
vinay Punekar murder case
हरियाणातील एका शेताच्या झोपडीत गाडून ठेवले पिस्तूल…आरोपीने स्वत: शेताचा नकाशा…..
Anand Mahindra shared off roader who was seen navigating through terrific The short video has a deep message For Monday Motivation
ऑफ रोड ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकाला पाहून आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘तो’ VIDEO; म्हणाले, ‘रस्ता कितीही…’

हेही वाचा – “पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?” प्रसिद्ध दिग्दर्शकाची वसई हत्या प्रकरणाबाबत संतापजनक पोस्ट, म्हणाले, “मुर्दाड बघ्यांचं…”

त्यानंतर इंद्रा, स्वाती, कोमल आणि सई हॉलमध्ये असतात. त्याचवेळी मुक्ता जेवण बनवतं असते. तर सागर डायनिंग टेबलवर बसून मुक्ताला इशारे करताना दिसतो. सागर मुक्ताला दिलेलं चॅलेंज कसं पूर्ण करते? याची तो वाट पाहत असतो. पण लवकरच मुक्ता हे चॅलेंज पूर्ण करताना पाहायला मिळणार आहे. इंद्रा, स्वाती, कोमल आणि सईसमोरचं मुक्ता सागरला किस करताना दिसणार आहे. या रोमँटिक सीनचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत, मुक्ता सगळ्यांसमोरून चालत जात सागरच्या बाजूला थांबते. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच असतं. मुक्ता नेमकं काय करतेय? हे सगळेजण पाहतच असतात. तितक्याच मुक्ता सागरची गालावर किस घेऊन तिथून पळून जाते. इंद्रा, स्वाती, कोमल या अवाकच होतात. पण सईला हे पाहून आनंद होतो. त्यामुळे आता येत्या भागात मुक्ता असं खरंच करणार आहे? की हे सागर किंवा मुक्ताला पडलेलं स्वप्न आहे? हे स्पष्ट होईल.

हेही वाचा – Video: “जर तू मेलीस तर मी…”; लेकीच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने क्रांती रेडकरला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “तीन फुटांची पण नाहीये…”

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी घसरताना पाहायला मिळत होता. पण आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी स्थिरावला आहे. पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सध्या टीआरपीच्या यादीत तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिला व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका आहे.