‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात सागर व मुक्ता हर्षवर्धनचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सावनीला घेऊन त्याच्या घरी जातात. त्यावेळी हर्षवर्धन त्याची मैत्रीण नताशाला एक लॉकेट घालत असतो. हे पाहून सावनीला धक्का बसतो. ती रागाच्या भरात जाऊन हर्षवर्धनच्या कानशिलात लगावते. पण त्यानंतर हर्षवर्धन त्याचा डाव बदलतो.

हर्षवर्धन मैत्रीणीला शैला ताई म्हणून हाक मारतो. ती कोणी मैत्रीण नसून ताई असल्याचं नाटक सागर, मुक्ता आणि सावनी समोर करतो. हात जोडून शैला ताईची माफी मागतो. या नाटकामुळे हर्षवर्धन संपूर्ण डाव पलटून लावतो. यावर पुन्हा सावनीचा विश्वास बसतो आणि सावनी स्वतःला मारून हर्षवर्धनची माफी मागते. यावेळी मुक्ता सावनीला समजवते की, हर्षवर्धन नाटक करतोय. खोटं बोलतोय. मी त्याला फोनवर बोलताना ऐकलंय. पण याचा काहीच फायदा होत नाही. शेवटी सावनी हर्षवर्धनवर विश्वास ठेवून पुन्हा त्याच्याजवळच जाते. मग सागर, मुक्ता हर्षवर्धनचा घरातून निघून जातात. सागर खूप चिडतो. तो मुक्ताला समजवतो. तुमचा चांगुलपणाचा फायदा सावनीसारख्या बाईला उचलून देऊ नका. या सर्व नाट्यानंतर महासप्ताहमध्ये सागर व मुक्ताचं प्रेम बहरताना पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

Tejashri Pradhan Premachi Goshta Upcoming Episode Mukta completed her challenge and kiss to sagar
Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन
Aishwarya and Avinash Narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
Premachi Goshta Fame komal gajmal and sanjivani Jadhav dance on Sooseki Song Of Pushpa 2 Movie
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती व इंद्राही जबरदस्त थिरकल्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर, पाहा व्हिडीओ
Sukanya Mone dance on pushpa 2 sooseki song viral on social media
“सूसेकी…”, सुकन्या मोनेंना पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल
Gharoghari Matichya Chuli fame Sumeet Pusavale and Reshma Shinde dance on sooseki Song Of Pushpa 2 The Rule Movie
Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर हृषिकेश-जानकीचा मराठमोळा ठसका, नेटकरी म्हणाले, “एकच नंबर…”

हेही वाचा – शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत झळकणार ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता, साकारणार ‘ही’ भूमिका

‘मराठी टेलीव्हिजन इन्फोर्मेशन’ इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सागर व मुक्ताच्या बहरणार प्रेमाचं नातं पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये सागर मुक्ताची किस घेताना दिसत आहे आणि त्यानंतर म्हणतो, “मी दिलेली ही गोष्ट माझ्या बायकोकडून परत हवीये मला.” त्यामुळे आता पुन्हा एकदा सागर व मुक्ताचं खुलणार प्रेम पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीने सोडली ‘अबोली’ मालिका, पोस्ट करत म्हणाली, “आजपर्यंत…”

प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा मागील आठवड्याचा टीआरपी

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी घसरताना पाहायला मिळत होता. पण आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी स्थिरावला आहे. पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सध्या टीआरपीच्या यादीत तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिला व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका आहे.