Premium

Video: अखेर मुक्ता-सागरचा पार पडला साखरपुडा; एकमेकांना घातली स्पेशल अंगठी

Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या साखरपुड्या दरम्यान सावनीचा येतो फोन तेव्हा…

tejashri pradhan serial premachi goshta new promo out mukta and sagar engagement
Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या साखरपुड्या दरम्यान सावनीचा येतो फोन तेव्हा…

‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारलेली मुक्ता, राज हंचनाळेने साकारलेला सागर तसेच इतर पात्र आता घराघरात पोहोचले आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता लवकरच मालिकेत शुभकार्य सुरू होणार आहे. गोखले-कोळी कुटुंबात लग्नीनघाईला सुरुवात झाली आहे. मुक्ता-सागरचा साखरपुडा पार पडला आहे. दोघांनी एकमेकांना स्पेशल अंगठी घातली आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या मुक्ताने दिलेल्या अटीनुसार मिहीर पोलिसांना शरण जातो. दुसरीकडे मुक्ता सागरबरोबर लग्न करण्यासाठी तयार होते. गोखले आणि कोळी कुटुंबात आनंदाच वातावरण पसरतं. फक्त सईसाठी मुक्ता-सागर लग्नासाठी तयार होतात. कोळी कुटुंब आता बोलणी करण्यासाठी गोखले कुटुंबाकडे गेले आहे. पण यादरम्यान पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबात एका गोष्टीवरून वादाची ठिणगी पडली आहे. लग्न कोणत्या पद्धतीने होणार? यावरून मुक्ताची आई आणि सागरच्या आईमध्ये पुन्हा वाद झाल्याचं काल पाहायला मिळालं. पण यावर तोडगा म्हणून सागरचे वडील चिठ्ठ्या उठवण्यासाठी सांगतात. आता जी चिठ्ठी येईल त्यापद्धतीने मुक्ता-सागरचं लग्न होणार आहे. अशातच मालिकेचे नवे प्रोमो समोर आले आहेत. ज्यामध्ये मुक्ताच्या घरचे सागरसाठी स्पेशल अंगठी देतात दिसत आहेत. तर सागर साखरपुड्यात मुक्ताला एक वेगळीच अंगठी घालताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘मॅन विदाऊट शॅडो’ ते ‘दुर्वा’; वाचा विनय आपटेंचा आजवरचा प्रवास अन् किस्से

‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्रामवर पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये पुढील भागात काय होणार आहे याचा व्हिडीओ शेअर करण्यात आले. ज्यामध्ये मुक्ताचे वडील तिला अंगठी दाखवत म्हणतात की, ही अंगठी सागरसाठी, कशी वाटते सांग? यावर मुक्ता म्हणते, “बाबा ही अंगठी आईने तुझ्यासाठी केलीये.” मुक्ताचे वडील म्हणतात, “आहे ना ही स्पेशल अंगठी? मग ती स्पेशल माणसालाच द्यायला हवी.” त्यावर मुक्ता म्हणते, “ज्याला प्रेमाची किंमत नाही, तो काय या अंगठीची किंमत करणार?”

तर दुसऱ्याबाजूला सागर व सईची भेट होताना पाहायला मिळत आहेत. यावेळी सई तिच्या बाबाला म्हणजे सागरला तिने बनवलेली एस नावाची अंगठी देते. तसेच मुक्ता-सागरच्या साखरपुड्याच्या वेळी सावनी फोन करते. त्यावेळी मिहिका मुक्ताचा साखरपुडा तिला असल्याचं सांगते. हे ऐकून सावनी म्हणते की, बघतेच मी सईची मुक्ता अँटी कोणाबरोबर साखरपुडा करतेय?

हेही वाचा – ‘बिग बॉस सीझन १३’मधील लोकप्रिय जोडीचं ४ वर्षांनंतर ब्रेकअप; धर्मामुळे झाले वेगळे

याशिवाय ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा आणखी प्रोमो समोर आला आहे. ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून त्यामध्ये मुक्ता-सागरचा साखरपुडा पाहायला मिळत आहे. साखरपुड्यात मुक्ता तिच्या बाबांनी दिलेली सागरसाठी स्पेशल अंगठी घालताना दिसत आहे. पण सागर सईने दिलेली अंगठी मुक्ताला घालत आहे. हेच पाहून मिहिका म्हणते की, हे काय लहान मुलांसारख? त्यावर सागर म्हणतो, “सईने बनवली आहे.” हे ऐकून मुक्ता म्हणते, “साखरपुड्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट मला सईकडून मिळाली आहे. एस फॉर सई.” त्यानंतर सागर म्हणतो की, सईने ही अंगठी माझ्यासाठी बनवली आहे. एस फॉर सागर. त्यावर मुक्ता म्हणते, “माझ्यासाठी एस फॉर सईचं राहील.”

दरम्यान, आता मुक्ता-सागरचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडताना दिसत आहे. पण हे पाहून सावनीची रिअ‍ॅक्शन काय असणार? ती काही नवा डाव रचणार का? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tejashri pradhan serial premachi goshta new promo out mukta and sagar engagement pps

First published on: 07-12-2023 at 16:18 IST
Next Story
“आमचं नातं आणि लग्न खासगी ठेवलं कारण…”, पियुष रानडेशी लग्न केल्यावर सुरुची अडारकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…