Tejashri Pradhan Nainital Trip : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय व सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या अभिनेत्री ‘झी मराठी’च्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तेजश्री साकारत असलेल्या स्वानंदीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, प्रेक्षकांची लाडकी स्वानंदी आता एका खास जागी फिरायला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधान ट्रिप जाण्याचं कारण खूपच खास आहे. अभिनेत्री सध्या तिच्या बर्थडे स्पेशल ट्रिपसाठी उत्तराखंडला पोहोचली आहे. २ जूनला तेजश्रीचा वाढदिवस असतो. त्यामुळे बर्थडे वीकमध्ये अभिनेत्री नैनिताल फिरणार आहे. या ट्रिपचे काही फोटो तेजश्रीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तेजश्रीचा नेहमीपेक्षा हटके लूक पाहायला मिळतोय. बेज रंगाचं शर्ट, buagi पँट, शर्टाला मॅचिंग अशी कॅप अन् शूज या Cool लूकमध्ये तेजश्री खूपच सुंदर दिसतेय. नैनिताल लेकजवळ तिने हे खास फोटोशूट केलं आहे. तसेच अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नैनिताल लेकचा नाइट व्ह्यू पाहायला मिळतोय. मात्र, अभिनेत्रीने तिच्या कोणत्याच फोटोंमध्ये तिचं लोकेशन रिव्हिल केलेलं नाहीये.

तेजश्री लिहिते, “उद्या मी पर्वतांच्या सानिध्यात असेन….म्हणून आधीच खबरदारी म्हणून सांगतेय. आय लव्ह यू ऑल इन Advance!” उद्या ( २ जून ) तेजश्रीचा वाढदिवस असून अनेकदा अशा निसर्गरम्य ठिकाणी नेटवर्कची समस्या उद्भवू शकते म्हणूनच अभिनेत्रीने या फोटोंना असं खास कॅप्शन दिलं आहे. तसेच Happy Life असा हॅशटॅग तिने या फोटोंना दिला आहे.

तेजश्री प्रधानची पोस्ट

तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मॅम तुमची स्माइल किती सुंदर आहे”, “आम्ही आता फक्त उद्याची वाट पाहतोय”, “तेजु ताई तुम्ही खूपच सुंदर दिसता”, “खूप सुंदर फोटोज”, “बर्थडे ट्रिप एन्जॉय करा मॅडम”, “आमची आवडती अभिनेत्री”, “मॅडम वाढदिवसाच्या Advance शुभेच्छा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत आता लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अखेर स्वानंदीसमोर समर राजवाडे प्रेमाची कबुली देणार आहेत. आता स्वानंदी-समरची ही लव्हस्टोरी कशी पुढे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.