scorecardresearch

“माझी इच्छा नसतानाही मला…” तेजस्विनी लोणारीचं ‘बिग बॉस’बद्दल मोठं विधान

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी या घरातून बाहेर पडली.

“माझी इच्छा नसतानाही मला…” तेजस्विनी लोणारीचं ‘बिग बॉस’बद्दल मोठं विधान

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. नुकताच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी या घरातून बाहेर पडली. तिची एक्झिट ही सर्वांसाठीच अनपेक्षित होती. आता तिने तिच्या या घराबाहेर पडण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

तेजस्विनीला टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागला.

आणखी वाचा : Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री

आता नुकतीच तिने ‘न्यूज 18 लोकमत’ ला एक मुलाखत दिली. त्यात तिला नाईलाजाने घराबाहेर पडावं लागल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, “बिग बॉसने माझं ऐकायला हवं होतं असं मला खूप वाटत होतं. कारण मी माझ्या हाताची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार होते. पण माझ्या भविष्यासाठी हा निर्णय देण्यात आल्याचं मला खरंच वाटत होतं की बिग बॉसने माझं ऐकायला हवं होतं. कारण मी सगळ्या जबाबदारी घ्यायला तयार होते. माझ्या हाताविषयीच्या प्रत्येक जबाबदारी मी घ्यायला तयार होते. पण माझ्या भविष्यासाठी हा निर्णय असल्याचं मला ‘बिग बॉस’नी सांगितलं. म्हणून मला माझ्या मनात नसतानाही बिग बॉसचं ऐकावं लागलं.”

हेही वाचा : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडे ढसाढसा रडली, नेटकरी म्हणतात “एवढं बदनाम करुन…”

तेजस्विनी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडण्याच्या या निर्णयाने सर्वांनाच दुःख झालं. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 17:49 IST

संबंधित बातम्या