scorecardresearch

Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीने स्पष्ट केले लग्न न करण्याचे कारण, म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीत…”

आता बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील काही ना काही गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करत असल्याचं दिसून येत आहे.

tejaswini

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ची सध्या चांगलीच चर्चा आहे. २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजशिर्के,अमृता धोंगडे, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, रुचिरा जाधव असे प्रसिद्ध चेहेरे या नव्या पर्वात झळकले आहेत. बिग बॉसच्या घरातून हे कलाकार पुढील १०० दिवस प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.

हेही वाचा : Exclusive video: अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून का दूर होत्या वर्षा उसगांवकर? अभिनेत्रीने केला खुलासा

आता बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील काही ना काही गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करत असल्याचं दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातली स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने नुकत्याच तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

महेश मांजकेरकांच्या चावडीनंतर तेजस्विनी आणि अमृता धोंगडे एकमेकींसोबत गप्पा मारताना दिसल्या. त्यावेळी तेजस्विनीच्या लग्नाचा विषय त्यांच्या संभाषणात निघाला. त्यावेळी तेजस्विनीने अमृताला सांगितलं, “माझ्या भावाने वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केलं होतं.” त्यावर अमृताने तिला विचारलं, “तू का नाही लग्न केलंस ?” अमृताच्या प्रश्नाचं‌ उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली, “ज्याच्याशी मी लग्न करेन असं मला अजून कोणी भेटलंच नाही आणि आपल्याला ज्याच्यासोबत लग्न करायचं असतं तो तयार होत नाही.”

आणखी वाचा : “१२ तास प्रवास करून एका सीनसाठी…”, ‘बिग बॉस’च्या घरात अपूर्वा नेमळेकरने सांगितल्या ‘शेवंता’च्या आठवणी

तेजस्विनीच्या या बोलण्यावर अमृताने तिला विचारले, “तुला आपल्या इंडस्ट्रीती कोणाशी लग्न करायचं आहे का?” यावर तेजस्विनी म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीत हॅन्डसम कोणी आहे का? कोणीच नाही…इंडस्ट्रीतला मला कोणीही आवडत नाही.” तेजस्विनी आणि अमृता यांच्यातील हे संभाषण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 13:56 IST

संबंधित बातम्या