मराठी मनोरंजनसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं गेल्यावर्षी १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्यावेळी त्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली होती. आज त्या हयात असत्या तर त्यांनी ७० वा वाढदिवस साजरा केला असता…असं म्हणत त्यांची लेक व लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट…
इतरांना कदाचित “हां एवढ काय”! आता झालं की वर्ष” असंही वाटण्याची शक्यता आहे… पण खरंच आई-वडील गेल्यावर आपल्या मनाच्या कुठल्यातरी भागात एक कायमची पोकळी निर्माण होते. जी कधीच कुणी भरून काढू शकत नाही आणि हे कुणीच नाकारू शकत नाही.
Random post नाहीये. आई गेल्यापासून सोशल मीडियावर मोजकच व्यक्त होता आलं. किंबहुना, नाहीच व्यक्त होता आलं.
May be this the last time I am explicitly expressing myself about my parents on this platform…
आज आईचा ७०वा वाढदिवस असता.
जोरात celebrate करायचा प्लॅन होता…..असो.
आई बाबा नेहमी म्हणायचे शिकत राहिलं पाहिजे.
शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची वृत्ती पाहिजे.
पण काय कमाल आहे ना!
आई-वडील झाल्यावर मूल वाढवायला कुणी शिकवत नाही, ते आपसूक येतं.
दुर्दैवाने, आई-वडील गेल्यावर मुलांना एकट्याने मोठं व्हायला आपसूक येत नाही, ते शिकावं लागतं.एक एक पाऊल पुढे टाकावंच लागतं.
अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात…
चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं,
झोप येत नसेल, थकवा आला असेल तर डोक्यावरून
हात फिरवायला कुणी येणार नाही हे गृहीत धरावं लागतं…
दाराकडे डोळे लावून वाट बघणारं कुणी नाही आणि वाट बघायला लावणारही कुणी नाही हे ही समजून घ्यावं लागतं…
आमचे आई बाबा दोघेही “अचानक” गेले.
अचानक या शब्दाचीच भीती वाटेल इतके अचानक.
कारण After losing parents at an early age,
nothing feels the same,
no achievement feels like one!
Its been 11 yrs since baba passed away and a year since aai left….May be grief will eventually fade
but this kind of loss never leaves.
आणि ना तुम्ही आत्तापर्यंत असता त्याच्यापेक्षा खूप बदलून जाता. Something shifts inside of u.
U carry the weight most people don’t understand.
खऱ्या अर्थाने तुम्हाला ‘मोठं व्हावं लागतं’
कारण आता आयुष्य आणि त्यातले अनुभवच तुमचे पालक होतात… शिकवतात. चांगलं-वाईट, सगळंच!But may be now I have to be ready.
Not to move on…to move forward.
त्यांच्या आठवणींचं बोट धरायचं, आयुष्याच्या शाळेत पुन्हा भरती व्हायचं आणि त्यांच्या संस्कारांचं दप्तर घेऊन पुढच्या परीक्षेसाठी शिकायला बसायचं …!!
So आई बाबा….आम्ही शिकत राहू.
तुमच्यासारखंच. शेवटच्या श्वासापर्यंत.
Let healing and grief co-exist !
तुमचे संस्कारच आमची सगळ्यात मोठी कमाई आहे.
तुम्ही शाररिक दूर गेले असाल आमच्यापासून पण
तुमच्या विचारांचा वारसा इथेच आहे. आमच्यासोबत.
आता तुम्ही एकमेकांची काळजी घ्या. आम्ही आमची घेतो.
खुप प्रेम
आई बाबा ……..अमर रहा
वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्योती!
दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमासह त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण साकारल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’, ‘ठरलं तर मग’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
