प्रत्येक महिलेला साज श्रृंगार कारावा, हवं तसं सजावं असं वाटतं. सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुणी डाएटबरोबर विविध प्रोडक्ट चेहऱ्यावर लावतात. या सर्वांत प्रत्येक महिला साडीत अगदी खुलून दिसते, त्यामुळे महिलांचं साडीवर प्रचंड प्रेम जडलेलं असतं. प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यात आपल्या जवळच्या अनेक वस्तूंवर विशेष प्रेम असतं. असंच काहीसं आता मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचंसुद्धा झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझं न संपणारं प्रेम…”, असं लिहित तेजस्विनी पंडितने एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच यातून तिचं प्रेम नेमकं कशावर जडलंय याचीसुद्धा तिने माहिती सांगितली आहे. तेजस्विनी पंडितने पोस्टमध्ये लिहिलं आहे, “माझं न संपणारं प्रेम (साडीसाठीचं) जमलंय? माझ्या बालमित्राने मला साडी आवडते म्हणून मागच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली होती. ती खूप दिवसांनी खणातून बाहेर काढली आणि इव्हेंटसाठी नेसली! साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही, बरोबर ना?” अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

तेजस्विनीने यासह साडी नेसलेले काही सुंदर फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. साडीवरील हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने फ्लोइंग पल्लू ठेवला आहे. गुलाबी रंगाच्या या साडीवर तिने लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे, तर हातात सुंदर बांगड्या घातल्या आहेत. मोकळे केस आणि कपाळी छोटीशी टिकली, सिंपल मेकअप अशा साध्या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. गुलाबी रंगाच्या या साडीवर तिने हेवी गुलाबी रंगाचे कानातलेही घातले आहेत.

गुलाबी साडीतील तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा आणि हार्ट इमोजींचा वर्षाव केला आहे. अनेक अभिनेत्रींनी कमेंटमध्ये तिचं साडीवरचं हे प्रेम मान्य केलं आहे. प्रार्थना बेहेरेने तेजस्विनीच्या या फोटोवर सुंदर अशी कमेंट केली आहे, तर क्रांती रेडकरनेसुद्धा तिचं कौतुक केलं आहे. अमृता देशमुखने तिच्या या फोटोंवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने मालिकांसह मोठ्या रुपेरी पडद्यावरदेखील दमदार अभिनय केला आहे. फक्त कलाकारच नाही तर एक निर्माती म्हणूनसुद्धा ती सिनेविश्वात नाव कमवत आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित आणि तेजस्विनी पंडित निर्मित ‘एक नंबर’ गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला. यातील तेजस्विनीच्या कामाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.

तेजस्विनी पहिल्यांदा २००४ मध्ये आलेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात तिने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘एक तारा’, ‘तू ही रे’, ‘देवा’, ‘येरे येरे पैसा’ अशा चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तेजस्विनी पंडितच्या ‘रानबाजार’ या वेब सीरिजवरसुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejaswini pandit endless love for saree actress shares beautiful photos and post rsj