छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध जोडी म्हणून गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांना ओळखले जाते. या सेलिब्रिटी कपलला आजवर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. एप्रिलमध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंत आता काही दिवसांपूर्वी गुरमीत-देबिनाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. मात्र अवघ्या सात महिन्यात पुन्हा आई होण्याचा हा प्रवास देबिनासाठी फारच अवघड होता. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे. देबिना बॅनर्जीने नुकतंच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने तिची पहिली मुलगी लियानाच्या जन्मानंतर अवघ्या सात महिन्यात पुन्हा आई झाल्याबद्दल भाष्य केले आहे. देबिनाला नैसर्गिकरित्या गरोदर राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे तिने आई होण्यासाठी आयव्हीएफ (IVF) प्रणाली आधार घेतला होता. तिने यावेळी तिच्या आयव्हीएफ उपचारांसाठी रुग्णालयातील त्या दिवसांबद्दल सांगितले आहे.आणखी वाचा : लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा बासू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म यावेळी देबिना म्हणाली, "मी आयव्हीएफ प्रणालीच्या चार फेऱ्यांचा पर्याय निवडला होता. त्यावेळी अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर अखेर मी लियानाच्या वेळी गरोदर राहिले. पण त्यापूर्वी मी गर्भधारणा करण्यासाठी सक्षम नाही, हे मला लक्षात आले होते. पण मला सर्वात जास्त त्रास तेव्हा झाला जेव्हा मला माझे नातेवाईक मुलांबद्दल विचारायचे. तू मुलाला कधी जन्म देणार आहेस, असे मला अनेकांनी विचारले. माझ्या आयुष्यातील हाच काळ सर्वात जास्त महत्त्वाचा होता. कारण त्यावेळी लोकांनी हे खरं असल्याचे मान्य केले आणि त्याचा स्वीकार केला." "अनेकदा मला विचारले जायचे की तू गुडन्यूज कधी देणार आहेस? पण आयुष्यातील हे एकमेव आनंद देणार कारण आहे का? जर मी आई होऊ शकत नसेन तर मी एक माणूस म्हणून तुम्हाला आनंदी करु शकत नाही का? असे अनेक प्रश्न मला पडायचे. यामुळे खूप त्रास व्हायचा. कदाचित ही आनंदाची गोष्ट असेलही, पण प्रयत्न करुनही जर ती गोष्ट होत नसेल तर ते फार वेदनादायी असते. आयव्हीएफच्या त्या उपचारांमुळे मी त्या काळात छोट्या-छोट्या गोष्टींवरुन खूप संवेदनशील व्हायची," असेही ती म्हणाली. आणखी वाचा : आई झाल्यानंतर बिपाशा बासूची पहिली पोस्ट, लेकीचं नाव ठेवलं… "कारण त्यावेळी माझ्यावर उपचार सुरु होते. माझ्या शरीरात अनेक हार्मोन्स सक्रिय होते, त्यामुळे माझे वजनही वाढले होते. माझे पोटही वाढले होते. यादरम्यान, मी एकदा टाईट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले होते, ज्यात माझे पोट दिसत होते. त्यावर एका नेटकऱ्याने तू प्रेग्नंट आहे का? अशी कमेंट केली होती. त्यावर मी काय उत्तर द्यावे हेच मला कळत नव्हते. अनेकदा लोक मला रुग्णालयात जाता-येताना पाहायचे. मी गरोदर आहे, पण लपवाछपवी करत आहे, असेही अनेकजण म्हणायचे. पण मी गरोदर नाही हे त्यांना कसे सांगू? मी प्रयत्न करतेय हे कसं सागू हेच मला कळत नव्हते. मला त्या दिवसांत खूप अस्वस्थ वाटायचे", असेही देबिना म्हणाली. देबिना आणि गुरमीत यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. या दोघांनी याच वर्षी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले होते. तर आता देबिना आणि गुरमीतच्या घरी आणखी एका छोट्या राजकुमारीचा जन्म झाला.