Tharala Tar Mag Marathi Serial Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनला प्रियाच्या वागणुकीवर संशय आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रतिमा, रविराज आणि प्रिया म्हणजेच खोटी तन्वी हे तिघं मिळून बाप्पाची प्रतिष्ठापना करतील असं पूर्णा आजीने ठरवलेलं असतं. मात्र, ऐनवेळी प्रियाचा डाव तिच्यावरच उलटतो आणि ती झोपून राहते. त्यामुळे बाप्पाची आरती सायली, प्रतिमा आणि रविराज किल्लेदारांच्या हस्ते पार पडते. यादरम्यान, प्रियाच्या चुकीच्या वागणुकीमुळे रविराज तिला सगळ्यांसमोर कानाखाली मारतात आणि सुनावतात.

खरंतर, सायली हीच खरी तन्वी आणि प्रतिमा-रविराज यांची मुलगी असते. हे सत्य प्रिया सोडून कोणालाच माहिती नसतं. याचाच गैरफायदा घेऊन प्रिया किल्लेदारांच्या घरात प्रवेश करते. प्रिया स्वत:च्या पायावर सायलीसारखी हुबेहूब जन्मखूण काढते आणि तिच खरी तन्वी असल्याचा बनाव रचते. आता लवकरच हे सत्य अर्जुनसमोर येणार आहे.

हेही वाचा : Video : “कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया…”, घराबाहेर येताच आर्याने रॅपमधून मांडलं रोखठोक मत! एकदा ऐकाच…

सुमन काकीमुळे अर्जुनसमोर येणार सत्य

रविराजने कानाखाली मारल्यावर प्रिया अर्जुनसमोर प्रतिमाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलते. कोणतीही मुलगी आपल्या आईबद्दल एवढं चुकीचं बोलणार नाही त्यामुळे प्रिया ही तन्वी असल्याचं केवळ नाटक करतेय असा संशय अर्जुनला येतो. याबद्दल तो सायलीला देखील सांगतो. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी अर्जुन सुमनकडे जातो. तो काकींची भेट घेण्यासाठी येतो आणि विचारतो, “सुमन काकू तुम्हाला मानलं पाहिजे. प्रियाच तन्वी आहे…हे जे काय तुम्ही ओळखलंय ना मस्तच!”

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत पहिल्यापासून सुमनचा स्वभाव अगदी साधाभोळा दाखवण्यात आला आहे. ती लगेच दुसऱ्यांच्या बोलण्यात गुंतून जाते. त्यामुळे अर्जुनला सुद्धा ती अगदी झटकन उत्तर देते. “अहो सोपं आहे. तन्वीच्या उजव्या पायावर जन्मखूण नाहीये का? त्यावरूनच तर मी तिला ओळखलं” असं उत्तर सुमनने देताच “आता काही करून ही जन्मखूण शोधायची” असं अर्जुन ठरवतो. यानंतर तो घरी येतो.

हेही वाचा : Video: ऐश्वर्या राय बच्चनला मिळाला पुरस्कार, लेक होती सोबतीला; कधी किस करताना तर कधी फोटो काढताना दिसली आराध्या

अर्जुन बघणार सायलीच्या पायावरची जन्मखूण ( Tharala Tar Mag )

अर्जुन रुममध्ये आल्यावर पाहतो तर, सायली बेडवर झोपलेली असते आणि तिच्या उजव्या पायाच्या तळव्यावर जन्मखूण असते. ती खूण पाहिल्यावर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आपली बायको सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य लवकरच अर्जुनसमोर येणार आहे. आता प्रियाचा ( Tharala Tar Mag ) खोटेपणा तो कसा उघड करणार आणि रविराज किल्लेदारांना याबद्दल कसं सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.