Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच अस्मिताचा नवरा सचिनची एन्ट्री झाली. या सचिनचं साक्षी शिखरेशी अफेअर असतं. अर्जुनने आधीच सचिनला एका मुलीबरोबर रोमान्स करताना पाहिलेलं असतं. मात्र, ती मुलगी साक्षी शिखरे आहे हे अर्जुनला अद्याप माहिती नाहीये. आपल्या बहिणीच्या सुखापोटी आणि ती गरोदर असल्याने अर्जुन सचिनच्या अफेअरबद्दल कोणालाच काहीच सांगत नाही. पण, आता जे घडायला नको तेच घडलं आहे. सचिनचे प्रताप सगळ्या सुभेदार कुटुंबीयांसमोर उघड झाले आहेत.
अस्मिता व कल्पना या दोघीजणी बाहेर गेल्या असताना सचिनला एका मुलीबरोबर रोमान्स करताना पाहतात. सचिन अस्मिताशी लग्न होऊन सुद्धा भर रस्त्यात एका वेगळ्याच मुलीला किस करतोय हे पाहून कल्पनाला धक्का बसतो. अस्मिता सुद्धा नवऱ्याचे प्रताप पाहून अस्वस्थ होते. सगळेजण घरी आल्यावर सचिनला घडलेल्या प्रकाराचा जाब विचारतात.
अस्मिता यावेळी प्रचंड संतापलेली असते. अर्जुनला यावेळी आपल्या बहिणीची प्रचंड काळजी वाटते. कसलाही विचार न करता तो सचिनला सणसणीत कानाखाली वाजवणार आहे. “जो माणूस परत-परत एकच चूक करतो…तो माणूस कधीच सुधारू शकत नाही…” असं अर्जुन रागाच्या भरात त्याला सुनावतो. यानंतर,”मी काही दिवसांपूर्वी सचिनला रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना पाहिलं होतं” असं अर्जुन सर्वांना सांगतो. हे ऐकल्यावर अस्मिताला अजूनच धक्का बसतो. तर, कल्पना त्याला म्हणते, “अर्जुन तू हे सगळं माहिती असूनही गप्प का राहिलास?”
अर्जुन सचिनला आणखी मारणार इतक्यात त्याला मागून “अर्जुन थांब” असा आवाज दिला जातो. घरात येणारी ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून पूर्णा आजी असते. आता पूर्णा आजी सुभेदारांच्या घरात पुन्हा येणार आहे.
आता पूर्णा आजी आल्यावर सचिन प्रकरण कसं हाताळणार? अर्जुन सचिनला काय शिक्षा देणार असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. याशिवाय ५ जानेवारीच्या विशेष भागात सुमन काकी महिपत आणि नागराजला एकत्र पाहणार आहे. महिपतला कुठे लपवून ठेवलंय याचा पत्ताही तिला सापडतो. ही माहिती देण्यासाठी ती सायलीला फोन करते पण, सुमन खरंच सायलीला सगळं खरं सांगू शकेल का? की त्याआधीच नागराज तिला पकडणार? याचा उलगडा ५ जानेवारीच्या विशेष भागात होईल.
