Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच सायली सचिन आणि साक्षीला कॅफेमध्ये एकत्र पाहते. यामुळे दोन गोष्टी तिच्यासमोर सिद्ध होतात. पहिली म्हणजे, सचिन अजूनही सुधारलेला नाहीये…त्याचं अफेअर सुरूच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साक्षी शिखरे जिवंत आहे…याचबरोबर सचिनचं अशा मुलीशी अफेअर सुरूये जी आधीच सुभेदार कुटुंबीयांची गुन्हेगार आहे.

या गोष्टी अस्मितासमोर सुद्धा उघड होतात आणि तिला या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसतो. अस्मिता दरवाजात चक्कर येऊन पडते. यामुळे सगळेजण काळजीत पडतात. पण, सुदैवाने यामुळे अस्मिताच्या जीवाला धोका निर्माण होत नाही. ती आणि बाळ दोघंही सुखरुप असतात. आता अस्मिताचं बाळासह सुभेदारांच्या घरात आगमन झालेलं आहे.

सुरुवातीच्या दिवसात अस्मिता सतत सायलीविरोधात काही ना काही कुरघोड्या करताना दिसायची. तिने प्रियाबरोबर हातमिळवणी केली होती. आता बाळाबरोबर घरी आल्यावर अस्मिता पुन्हा एकदा सायली-अर्जुनच्या विरोधात भूमिका घेणार आहे.

Award Banner

बाळाला पाहण्यासाठी सचिन सुभेदारांकडे आलेला असतो. यावेळी अर्जुन त्याला अडवतो आणि तो अजूनही सुधारलेला नाहीये याबद्दल सचिनला जाब विचारतो. पण, याचा काहीच फायदा होत नाही. कारण, अस्मिता या दोघांमध्ये मध्यस्थी करत खोटारड्या नवऱ्याची ठामपणे बाजू घेताना दिसते.

अस्मिता सगळ्यांच्या विरोधात जाऊन सायलीला म्हणते, “माझा सचिनवर पूर्ण विश्वास आहे. सायली तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलला असता तर तू त्याला माफ केलंच असतं ना?” यावर सायली म्हणते, “अजिबात नाही…माझ्याकडे अशा खोटेपणाला अजिबात माफी नाहीये.” आता या सगळ्या ड्रामानंतर सचिनबाबत सुभेदार कुटुंबीय काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, हे सगळं घडल्यावर अर्जुन सायलीला विचारतो, “जर सर्वांच्या भल्यासाठी काही गोष्टी मला तुझ्यापासून लपवाव्या लागल्या तर तू खरंच आपलं नातं संपवून टाकशील का?”

यावर सायली त्याला विचारते, “तुम्ही असं केलंय का? माझ्यापासून खरंच तुम्ही काही लपवताय का?” हे ऐकून अर्जुनची बोलती बंद होते. आता बायकोच्या प्रश्नावर अर्जुन काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.