Tharala Tar Mag Fame Jui Gadkari Nicknames : जुई गडकरीला मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय जुईची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात टीआरपीमध्ये नंबर वन आहे. गेली साडेतीन वर्षे ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. काही वर्षांपूर्वीच्या स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुईला लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तिने बऱ्याच भूमिका साकारल्या पण, आता ‘ठरलं तर मग’मध्ये ती सायलीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, सायलीने सर्वांच्या मनात घर केलंय.

गेली अनेक वर्षे कलाविश्वात सक्रिय असल्याने जुईला आता तिने आजवर साकारलेल्या भूमिकांच्या नावांनुसार तिला ओळखलं जातं. उदा. सायली, कल्याणी… पण, खऱ्या आयुष्यात सुद्धा जुईच्या घरच्यांनी तिला खास टोपणनावं दिली आहेत. ही नावं नेमकी काय आहेत याबाबत जुईने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता.

जुईची टोपणनाव काय आहेत?

‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी संवाद साधताना अभिनेत्री जुई गडकरी म्हणते, “मला घरामध्ये जुया म्हणतात. मित्र-मैत्रिणी देखील जुया नावाने हाक मारतात. माझी आई मला मिनू म्हणते. तर माझ्या गायनाच्या शिक्षिका सुप्रिया महाजन त्या मला, झुमा, जुडा अशी हाक मारतात. तसेच माझ्या भावाने मला ‘घंटागाडी’ असं नाव दिलं आहे. कारण मी सतत साफसफाई करत असते म्हणून त्याने माझं नाव मोबाइलमध्येही ‘घंटागाडी’ असं सेव्ह केलं आहे.

Award Banner

दरम्यान, जुई साकारत असलेल्या सायलीच्या भूमिकेला सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात सायलीला ‘सर्वोत्कृष्ट सून’ हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला आहे.

याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या सायली प्रियाचा संपूर्ण भूतकाळ शोधून काढतेय. प्रिया हीच बबली लोखंडे आहे हे सायलीला कळून चुकलंय. आता प्रियाचा हा खोटेपणा सुभेदारांसमोर उघड झाल्यावर ते या गोष्टीवर विश्वास ठेवणार का? याशिवाय खरी तन्वी कोण याचा शोध अर्जुन घेऊ शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात मिळतील. तसेच अर्जुन-सायली अस्मिताचा खोटारडा नवरा सचिनवर सुद्धा लक्ष ठेवून आहेत.