Tharala Tar Mag Serial BTS Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुभेदार कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुनच्या वाढदिवशी काहीतरी मोठा धमाका करायचा असा विचार प्रिया करते आणि ती अस्मिताच्या मदतीने अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल शोधून काढते. आपल्या लेकाचं करारानुसार लग्न झालंय हे पाहताच कल्पना प्रचंड संतापते.

अर्जुन-सायली घरी पोहोचताच त्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल जाब विचारला जातो. कल्पना या फसवणुकीसाठी मुलाच्या कानाखाली सुद्धा वाजवते. शेवटी राग अनावर होऊन ती सायलीला घराबाहेर काढते. सायलीला हाताला धरून घराबाहेर धक्का मारून बाहेर काढलेलं पाहताच अर्जुन प्रचंड भावुक होतो. या सगळ्या प्रकरणात मी सुद्धा तेवढाच दोषी आहे त्यामुळे मी सुद्धा घर सोडून जातो असं तो आपल्या आईला सांगतो. पण, सायली अर्जुनला घराबाहेर जाण्यापासून थांबवते. त्याला शपथ देते. इतक्यात मधुभाऊ सायलीला घेऊन निघून जातात. अर्जुन प्रचंड बिथरतो. यानंतर मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. याचा प्रोमो ( Tharala Tar Mag ) नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझ्यावर कितीही रुसलीस…”

जुई गडकरीने शेअर केला BTS व्हिडीओ

सायली देवीआईसमोर व्रत करणार आहे. वाहिनीवर २३ डिसेंबरपासून ‘मार्ग दाखवणारा मार्गशीर्ष’ या सेगमेंटमध्ये विशेष भाग सुरू होणार आहेत. यामध्ये सायली देवीआईसमोर म्हणते, “अर्जुनची पत्नी आणि मधुभाऊंची मुलगी या दोन्ही नात्यांनी मला माझं कर्तव्य बजावण्याची शक्ती दे” या नव्या प्रोमोचा BTS व्हिडीओ जुईने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

जुई लिहिते, “अलीकडे शूट झालेल्या प्रोमोचा BTS व्हिडीओ मी शेअर केलाय… संपूर्ण युनिट एका प्रोमोसाठी कसं काम करतंय पाहा… तसेच प्रोमोमध्ये दिसणारं मंदिर हे खरं नसून तो शूटिंगचा सेट आहे. त्यामुळे याठिकाणी चपला घालाव्या लागतात कारण, आजूबाजूला मोठ्या व्होल्टेजच्या वायर आहेत! त्यामुळे या व्हिडीओवर कमेंट करण्यापूर्वी काळजी घ्या… तसेच पाहत राहा स्टार प्रवाह!”

हेही वाचा : 100 Years of Raj Kapoor : राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव का होता? ‘आवारा’चा गाजलेला किस्सा काय?

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत आता पुढे काय पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर झाले आहेत. सायलीला घराबाहेर काढल्यावर भविष्यात या दोघांच्या नात्याचं काय होणार, सुभेदार सायली-अर्जुनला माफ करणार की नाहीत, खऱ्या तन्वीचं सत्य केव्हा समोर येणार या सगळ्या गोष्टी मालिकेच्या येत्या भागांमधून हळुहळू प्रेक्षकांसमोर येतील.

Story img Loader