‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी सध्या घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामध्ये तिने सायली ही प्रमुख भूमिका साकारली आहे. जुईने आजवर साकारलेल्या सगळ्याच भूमिकांचं भरभरून कौतुक झालेलं आहे. परंतु, अभिनयाबरोबरच जुई उत्तम गायिका म्हणून देखील ओळखली जाते. तिला गाण्यांची प्रचंड आवड आहे. इन्स्टाग्रामवर जुई तिच्या स्वत:च्या आवाजातील विविध गाणी शेअर करत असते.

जुईच्या सुरेल आवाजाचं तिचे सगळेच चाहते कौतुक करत असतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्री गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं सहाबहार गाणं गात आहे. या गाण्याचे बोल आहेत “भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते…” कवी ग्रेस यांची ही कविता असून हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेला संगीत दिलेलं आहे. तसेच गानसम्राज्ञी लता दीदींचा आवाज या गाण्याला लाभला होता.

हेही वाचा : “माझ्या मुलीचा जन्म होणार होता, तेव्हा…”, ‘गजनी’ फेम असिनच्या पतीचं बोलणं ऐकून अक्षय कुमार झाला भावुक; म्हणाला…

जुई या गाण्याचा सुरेल व्हिडीओ शेअर करत लिहिते, “जेव्हा तुमच्याकडे थोडा मोकळा वेळ आणि रिकामी खोली असते तेव्हा तुम्ही अशाप्रकारे गाणं गात वेळ घालवता. माझ्या आवडीच्या गाण्यांपैकी एक गाणं…खूप मनापासून गाण्याचा प्रयत्न केला. अजून बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत…लता मंगशेकर यांचं हे गाणं!”

हेही वाचा : “ट्रोल केलं, नातेवाईकांचे फोन आले”, रोहित-जुईली लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल स्पष्टच बोलले; म्हणाले, “नाक खुपसू नका…”

जुई गडकरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “अभिनयाप्रमाणे तुम्ही अतिशय सुंदर गाता”, “इतके सुरेल स्वर कानावर पडल्यावर भय कोणाला वाटेल?”, “तुमचा आवाज फार छान आहे”, जुई मॅडम मस्तच!, “सुरेख…” अशा असंख्य प्रतिक्रिया युजर्सनी जुईने शेअर केलेल्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : “जिच्यासाठी ते भांडले….”, ऐश्वर्या रासाठी विवेक ओबेरॉय अन् सलमानच्या भांडणावर सलीम खान यांनी दिलेली प्रतिक्रिया

दरम्यान, सध्या जुई गडकरी ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे. गेल्या काही वर्षांत तिने मालिकाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर, तिची ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या वर्षभरापासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता अमित भानुशाली प्रमुख भूमिकेत झळकला आहे.