‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय असणारी ‘ठरलं तर मग’ मालिका नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून अडीच वर्ष टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ‘ठरलं तर’ मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. फक्त अर्जुन, सायली नव्हे तर प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यापैकी दोन पात्र म्हणजे चैतन्य व साक्षी.

अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने चैतन्य व अभिनेत्री केतकी पालवने साक्षी ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. जशी ऑनस्क्रीन दोघांची बॉन्डिंग आहे, त्यापेक्षा वेगळी दोघांची बॉन्डिंग ऑफस्क्रीन पाहायला मिळते. सोशल मीडियावर चैतन्य व साक्षी म्हणजे चैतन्य व केतकीचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात.

हेही वाचा – Video: लग्नातच घटस्फोट! ‘अंतरपाट’ नव्या मालिकेच्या हटके प्रोमोने वेधलं लक्ष, कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

नुकताच चैतन्यने साक्षीबरोबरचा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत चैतन्य व साक्षी शाहरुख खान व माधुरी दीक्षितच्या ‘ढोलना’ या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ‘ढोलना’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. त्यानुसारच चैतन्य व साक्षीने डान्स केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: हृतिक रोशनचा मुलगा झाला पदवीधर, सुझान खान व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तुझी आई असल्याचा अभिमान…”

हेही वाचा – Video: ठरलं! ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार समीर परांजपे, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

चैतन व साक्षीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “चैतन्य तू खूप गोड आहेस”, “तुम्ही दोघं एकदम सारखे दिसता”, “तुम्ही दोघं खूपच गोड आहे”, “डान्स भारी केला आहे”, “जोडी नंबर वन’, “चैतन्य खूप भारी…पण मला साक्षी आवडत नाही”, “खूप सुंदर जोडी”, “लय भारी”, “कमाल”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. याआधी चैतन्य व साक्षीने बरेच मजेशीर व डान्स व्हिडीओ केले होते.

मालिकेत सध्या काय सुरू आहे?

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या मधु भाऊंच्या सुटकेसाठी अर्जुन-सायली जमेल तितकेच प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवानी नावाचा मोठा साक्षीदार अर्जुन-सायलीच्या हाती आहे. पण शिवानी अर्जुन-सायली मदत करायला कशी तयार होणार? ती साक्षी विरोधात खरी साक्ष देणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.