अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या ती 'ठरलं तर मग' या मालिकेत सायली हे पात्र साकारत आहे. ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे, गेले कित्येक महिने 'ठरलं तर मग' मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. यंदा या मालिकेच्या सेटवर बाप्पाची मनोभावे आराधना केली जाणार आहे. मालिकेच्या सेटवर गणेशोत्सवाची कशी तयारी केली? याबद्दल जुई गडकरीने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. हेही वाचा : Video : “आमच्या घरी गणपती बसत नाही पण…”, क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना बाप्पाची ओढ; नेटकरी म्हणाले, “किती गोड…” जुई गडकरी म्हणाली, "मला लहानपणापासून उकडीचे मोदक करता येतात. मोदक करता आले पाहिजे हा आमच्या घरचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येकाला उकडीचे मोदक येतात. दुडीचे मोदक, मोडीच्या करंज्या हे सगळे प्रकार आता मला व्यवस्थित करता येतात. जेवण करणं ही एक कला आहे. मला या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करायला आवडतात. म्हणूनच आमच्या मालिकेच्या सेटवर सुद्धा मी परवाच मोदक केले होते." हेही वाचा : “‘खुपते तिथे गुप्ते’ का बंद करताय?”, चाहत्याच्या प्रश्नाला अवधूत गुप्तेने दिलं उत्तर, म्हणाला… जुई गडकरी पुढे म्हणाली, "'ठरलं तर मग' मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये सायली अर्जुनला मोदक कसे बनवायचे हे शिकवणार आहे. मोदकांवर आधारित संपूर्ण एक सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सेटवरच्या दादांना मी आधीच मोदक बनवायचे आहेत ही कल्पना दिली होती. पण, मोदक उकड काढून बनवतात याची कल्पना त्यांना नव्हती." हेही वाचा : Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ "मोदकांबद्दल फारसं कोणाला माहित नसल्याने मी सेटवर तांदळाच्या पीठाची उकड काढली, मालिकेत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आम्हाला जवळपास बारा ते पंधरा मोदक हवे होते ते मी स्वत: बनवले. याशिवाय अर्जुन-सायलीच्या सीनसाठी लागणारे मोदक सुद्धा मीच बनवले होते." असं सायलीने सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर बाप्पाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट आणि मोदक केल्याचा BTS व्हिडीओ जुई गडकरीने शेअर केला होता.