Tharala Tar Mag BTS Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता लवकरच अर्जुन सायलीसमोर आपलं प्रेम व्यक्त करणार असल्याचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. मालिका सुरू झाल्यापासून तब्बल दोन वर्षांनी हा क्षण येणार असल्याने सगळेच प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच मालिकेचा हा बहुप्रतिक्षीत रोमँटिक प्रोमो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण, गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-सायलीच्या प्रेमात प्रिया नेहमीच काही ना काही अडथळे आणतेय असं पाहायला मिळत होतं त्यामुळे प्रेक्षक यावर काहीसे नाराज झाले होते. अखेर आता सगळे ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ आला आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

हेही वाचा : Video : तुळजा-शिवाच्या हाती लागणार मोठे सत्य! कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक कोण? दोन्ही मालिकांच्या ‘महासंगम’मध्ये काय घडणार?

जुई गडकरीने शेअर केला मालिकेचा BTS व्हिडीओ

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत अर्जुन सायलीला अंगठी घेऊन प्रपोज करणार आहे. त्यामुळे या प्रोमोला अवघ्या काही तासांतच १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. म्हणूनच सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने एक पोल घेऊन तुम्हाला शूटिंगचा BTS व्हिडीओ पाहायचाय का असं विचारलं होतं. नेटकऱ्यांचा प्रतिसाद पाहता जुईने लगेच या सीन शूट होतानाचा पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे.

जुई या प्रोमोमध्ये ( Tharala Tar Mag ) हॉटेलच्या टेबलवर अर्जुनची वाट बघत बसलेली असते. तिच्यासमोर गुलाबाची आणि चाफ्याची फुलं ठेवलेली असतात. प्रोमोत पाहिल्यानुसार जुई मनातून चलबिचल झाल्याचा अभिनय करत आहे. रोमँटिक ट्रॅक असल्याने ब्लोअरने तिचे केस उडतील अशी सगळी व्यवस्था ऑफ कॅमेरा करण्यात आली होती. तर, हा सीन शूट होताना प्रत्यक्षात देखील मालिकेचं शीर्षक गीत बॅकग्राऊंडला वाजत होतं. त्यामुळे या सीनसाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : सुपरस्टार नागार्जुन यांची होणारी सून आहे तरी कोण, काय काम करते? अखिल अक्किनेनीची भावी पत्नी आहे सोशल मीडियापासून दूर

हेही वाचा : रेश्मा शिंदे ‘या’ दिवशी करणार लग्न; मेहंदीमध्येच दडलीये लग्नाची तारीख, तुम्ही पाहिलीत का?

जुईने या व्हिडीओला, “टीमवर्कने सगळ्या गोष्टी साध्य होतात… बहुप्रतिक्षीत प्रोमोचा BTS खास तुमच्यासाठी” असं कॅप्शन दिलं आहे. तर, नेटकऱ्यांनी या BTS व्हिडीओवर सुद्धा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “जर का dream sequence निघाला तर मग काही खरं नाही…”, “जुई मॅम आम्ही खूप वाट बघतोय…प्लीज आता तरी हे खरं होईल ना?”, “खूप वाट बघतोय आम्ही, की कधी सायली अर्जुन एकमेकांना प्रेम व्यक्त करतील” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर ( Tharala Tar Mag ) आल्या आहेत.

Story img Loader