Marathi Serial TRP Updates : गेल्या काही दिवसांपासून ‘झी मराठी’वरील मालिकांच्या टीआरपीमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात झी मराठीच्या चार ते पाच मालिका स्लॉट लीडर ठरल्या होत्या. यानंतर स्टार प्रवाहकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. ‘नशीबवान’ मालिकेची वेळ बदलून ही सिरियल दुपारच्या सत्रात शिफ्ट करण्यात आली आहे. तर, ‘ठरलं तर मग’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ या टीआरपी टॉपर मालिका सध्या पाऊण तास प्रसारित केल्या जात आहेत.
‘स्टार प्रवाह’ने महत्त्वाच्या मालिकांच्या वेळेत बदल केल्यावर टीआरपी आकडेवारीत सुद्धा बदल जाणवला आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका या शर्यतीत नेहमीप्रमाणे पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर आहे अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका.
सध्या ‘ठरलं तर मग’ मालिका पाऊण तास (८:४५ ते ९:३० ) प्रसारित केली जाते, त्यामुळे अर्थातच रात्री नऊची स्लॉट लीडर सुद्धा हीच मालिका ठरली आहे.
‘कमळी’ स्लॉट लीडर नसली तरी टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, ‘तारिणी’ या यादीत चौथ्या स्थानी आहे. ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
एकीकडे कमळीची महाजनांच्या घरी एन्ट्री, रायगडावर साजरी केलेली शिवजयंती या कथानकाने लक्ष वेधून घेतलं होतं. तर, ‘तारिणी’मध्ये लवकरच केदार-तारिणीची लगीनघाई सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या दोन्ही मालिकांच्या टीआरपीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी मालिकांचा टीआरपी
- ठरलं तर मग – ४.३
- तू ही रे माझा मितवा – ४.१
- कमळी – ३.८
- तारिणी – ३.६
- मी सावित्रीबाई जोतिराव फुले – ३.५
- वीण दोघांतली ही तुटेना – ३.४
- लक्ष्मी निवास – ३.३
लग्नानंतर होईलच प्रेम – ३.३
तुझ्या सोबतीने – ३.३ - देवमाणूस – ३.१
- वचन दिले तू मला – ३.०
- तुला जपणार आहे – २.५
दरम्यान, तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका गेल्या आठवड्यात ३.४ रेटिंगसह सहाव्या स्थानी आहे. फेब्रुवारी महिन्यात तेजश्रीची मालिका सलग काही आठवडे स्लॉट लीडर ठरली होती. तर, रात्री उशिराच्या म्हणजेच रात्री ११ वाजताच्या स्लॉटला सुद्धा ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
