Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात प्रेक्षकांना सायली अन् अर्जुन बाहेर फिरायला गेल्याचं पाहायला मिळालं. सायली गरोदर असते…त्यामुळे तिचे प्रत्येक हट्ट अर्जुन पुरवत असतो. हे दोघंही बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनवतात. यावेळी सायली तन्वीच्या लूकप्रमाणे तयार होऊन येते. दोघंही एकत्र वडापाव खातात आणि एन्जॉय करतात. दुसरीकडे प्रिया जेलमध्ये राहून सुभेदारांना कसं उद्धवस्थ करता येईल याचं प्लॅनिंग करत असते.

प्रियाला जेलमध्ये एक मुलगी भेटायला जाते…या मुलीची ओळख अजूनही रिव्हिल करण्यात आलेली नाहीये. मात्र, साक्षी शिखरे प्लास्टिक सर्जरी करून…नव्या लूकमध्ये अवतरल्याचा अंदाज सध्या प्रेक्षक व्यक्त करत आहेत. प्रिया, नागराज, महिपत यांची कारस्थानं काही केल्या संपत नाहीयेत. पण, आता मालिकेत एक नवीन वळण सर्वांना पाहायला मिळेल.

सायली आई होणार असल्याने तिचे आता डोहाळे सुरू झाले आहेत. अर्जुन सुद्धा लाडक्या बायकोच्या सगळ्या इच्छा पुरवणार आहे. तो सायलीसाठी खास लाडू बनवतो…हे लाडू त्याला व्यवस्थित वळता येत नाहीत. पण, नवऱ्याने प्रेमाने बनवलेले हे लाडू सायली सुद्धा मोठ्या आनंदाने खाते.

दुसरीकडे, प्रतिमा लाडक्या लेकीसाठी गजरा घेऊन येते. सायलीच्या फुलांची अर्जुनला अ‍ॅलर्जी असते…त्यामुळे त्या गजऱ्याचा सुगंध घेतल्यावर त्याला शिंका येऊ लागतात. यावेळी सायलीची सासू कल्पना म्हणते, अर्जुनला सायलीच्या फुलांची अ‍ॅलर्जी आहे. पण, इतक्यात सायलीला सुद्धा शिंका येणं सुरू होतं…यावर प्रतिमा म्हणते, आता अर्जुनला अ‍ॅलर्जी आहे म्हटल्यावर…बाळाला सुद्धा हा वास सहन होत नसेल. यानंतर या दोघी मिळून अर्जुन-सायलीची फिरकी घेत खळखळून हसतात.

‘ठरलं तर मग’ मालिकेचे हे विशेष भाग या आठवड्यात रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येतील. आता सुभेदार कुटुंबीय सायलीची कशी काळजी घेणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अश्विन प्रियापासून विभक्त होण्याचा निर्णय घेणार की नाही हे आगामी भागात पाहायला मिळेल.

याशिवाय मालिकेत नव्याने एन्ट्री झालेली मुलगी नेमकी कोण आहे? याबद्दलही सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मुलीच्या पात्राचं नाव जरी समोर आलं नसलं तरीही या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री संचिता कुलकर्णी झळकत असल्याचं स्पष्ट झालं आहे.