Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या गणेशोत्सवाचा सीक्वेन्स चालू आहे. जवळपास २० वर्षांनी घरी परतलेल्या प्रतिमाच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करायची असं पूर्णा आजी ठरवते. ठरल्याप्रमाणे प्रिया ( खोटी तन्वी ), रविराज आणि प्रतिमा हे किल्लेदार कुटुंबीय बाप्पाची पूजा करणार असतात. मात्र, पूजा करताना सायली-रविराज यांच्यासह एकत्र पूजा करताना प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल की काय… अशी भीती प्रियाच्या मनात असते. त्यामुळे सायलीला या पूजेला येऊ द्यायचं नाही असं प्रिया ठरवते.

सायलीचं प्रतिमा व रविराज यांची खरी मुलगी तन्वी असते. अपघातानंतर आश्रमात वाढल्याने कोणालाच तिची खरी ओळख माहिती नसते. याचाच फायदा प्रिया घेते आणि खोटी तन्वी होऊन किल्लेदारांच्या घरी राहायला जाते. मात्र, प्रतिमाच्या परत येण्याने प्रियाच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रतिमाची स्मृती संपूर्णपणे गेलेली असते. तरीही, सायलीच्या प्रेमाखातर ती हळुहळू सुभेदारांच्या घरात रुळत असते. प्रिया सायलीला झोपवून ठेवण्यासाठी आणि ती पूजेला येऊ नये म्हणून तिच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळते. हा प्लॅन प्रियावरच उलटतो.

हेही वाचा : Video : …अन् वर्षा उसगांवकरांनी अरबाजला दाखवला ठसका! निक्की सुद्धा लाजली; घरात हास्यकल्लोळ, पाहा प्रोमो

रविराज प्रियाला कानाखाली मारणार

बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सुभेदारांच्या घरी भटजी येतात आणि सगळ्या मंडळींना पूजेसाठी बोलावून घ्या असा निरोप देतात. यावेळी प्रिया अजून झोपलेली आहे असं कल्पना पूर्णा आजीला सांगते. यावर पूर्णा आजी प्रतिमा आणि रविराजबरोबर सायली पूजा करेल असा निर्णय घेते. सायली प्रतिमा आणि रविराज किल्लेदार हे तिघं मिळून गणरायाची मनोभावे पूजा करत असतात. एवढ्यात प्रिया खोलीतून बाहेर येते आणि सायलीला रविराज-प्रतिमाबरोबर पूजा करताना पाहून प्रिया भयंकर संतापते.

किल्लेदार कुटुंबीय एकत्र करणार पूजा ( Tharala Tar Mag )

सायलीच्या हातात आरतीचं ताट असतं. तेवढ्यात प्रिया येऊन सायलीच्या हातातून आरतीचं ताट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. या दोघींच्या जवळ प्रतिमा उभी असते. आधीच तिला महिमतने जाळण्याचा प्रयत्न केलेले असतो. त्यामुळे आग पाहून प्रतिमा प्रचंड घाबरते. ती मागे-मागे जाते. रविराज किल्लेदार प्रतिमाची अस्वस्थता बरोबर ओळखतात आणि तिला एका बाजूला ओढतात. शेवटी भडकलेले रविराज प्रियाला थेट कानाखाली मारतात. असं या प्रोमोमध्ये ( Tharala Tar Mag ) पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “डोकं लावून गेम खेळलो नाही…”, ‘डबल ढोलकी’ आरोपाविषयी घन:श्याम स्पष्टच बोलला; घराबाहेर आल्यावर पहिली प्रतिक्रिया

रविराज लहानपणापासून तन्वीचे प्रचंड लाड करत असतात. त्यांची ती लाडकी असते. त्यामुळे प्रियाला सुद्धा आपली खरी मुलगी समजून ते प्रचंड जीव लावत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रियाच्या अनेक गोष्टी खटकत असतात. अखेर प्रतिमाला त्रास झाल्याचं पाहताच रविराज कोणताही विचार न करता प्रियाला थेट कानाखाली मारणार असल्याचं मालिकेच्या ( Tharala Tar Mag ) नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.