'ठरलं तर मग' मालिकेत सध्या प्रिया माफीची साक्षीदार होण्याच्या तयारीत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया सायली विरोधात अनेक कट रचत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्यात ती नेहमीच तोंडावर पडते. अशातच साक्षी शिखरे प्रियाला अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल माहिती देते आणि त्या संदर्भातील फाइल काही करून मिळव असं सांगते. प्रिया ठरल्याप्रमाणे अर्जुनच्या ऑफिसमधून फाइल चोरते पण, ऐन मोक्याच्या क्षणी सायली-अर्जुन सावध होतात. प्रिया फाइल घेऊन पळून गेल्याचं सायलीला समजतं. त्यामुळे प्लॅन करून अर्जुन-सायली तिच्या मागे जातात. अर्जुन वेश बदलून तिच्यासमोर जातो आणि तिला बोलण्यात गुंग करतो एवढ्यात मागून सायली येते आणि फाइल बदलून ठेवते. प्रिया बदललेली फाइल घेऊन सुभेदारांकडे जाते आणि पूर्णा आजीला अर्जुन-सायलीचं लग्न खोटं आहे हा पुरावा बघ म्हणून सांगते. हेही वाचा : अंबानींच्या मोठ्या सुनेने २३ वर्षांनी रिक्रिएट केला करीना कपूरचा ‘बोले चुडिया’ लूक! श्लोकाला ‘त्या’ रुपात पाहून बेबो देखील भारावली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल आधीच बदलल्याने पूर्णा आजीसमोर प्रिया पुन्हा एकदा तोंडावर पडते आणि आजी सर्वांसमोर तिला कानशिलात लगावते. यामुळे एकंदर सर्वांच्या मनातून ती उतरते. साक्षी, महिपत व नागराज हे तिचे साथीदार सुद्धा तिच्या विरोधात जातात. अशावेळी या लोकांविरोधात (साक्षी, महिपत व नागराज) एक व्हिडीओ तयार करून प्रिया अर्जुनला पाठवते. त्यामुळे प्रिया लवकरच माफीचा साक्षीदार होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असताना सायलीच आपल्या घरासाठी योग्य सून असल्याचा विश्वास पूर्णा आजीच्या मनात निर्माण होतो. पूर्णा आजी सुभेदारांच्या घरातील सर्व कुटुंबीयांना एकत्र बोलावते आणि सर्वांसमोर सायलीचा नातसून म्हणून स्वीकार करते. एवढंच नव्हे तर पूर्णा आजी सायलीच्या हातात घराची किल्ली सोपवते. सायली सुभेदारांच्या घराची संपूर्ण जबाबादारी घेईल असा विश्वास आजीला वाटत असतो. मात्र, अस्मिता हे सगळं पाहून नाराज होते. सायलीच्या हातात सगळी सूत्र गेल्याने तिचा राग अनावर झालेला असतो. हेही वाचा : अधिपतीच्या वाढदिवशी मास्तरीण बाईंची पोस्ट! शिवानी रांगोळेने ऑफस्क्रीन कुटुंबाचा फोटो शेअर करत दिला खास सल्ला https://www.instagram.com/reel/C9JznfBpL6i/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== पूर्णा आजीने आपला सून म्हणून स्वीकार केल्यानंतर सायलीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पूर्णा आजीने नातसून म्हणून स्वीकारणं, तिने डोक्यावर हात ठेवणं सायलीसाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळं ती अर्जुनला सांगते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही सायलीला झालेला हा आनंद पाहून अर्जुन देखील भारावून जातो. आता येत्या भागात पूर्णा आजी व सायली एकत्र आल्यामुळे मालिकेत नवीन काय वळण येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.