Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत नेहमीच काही ना काही ट्विस्ट येत असतात. सतत कपटी प्रिया अर्जुन-सायलीच्या सुखी संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करत असते. पण, आयुष्यात एवढे सगळे अडथळे येऊनही सायली-अर्जुन कधीही एकमेकांची साथ सोडत नाहीत. मालिकेत अर्जुन नेहमीच बायकोविषयीचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत असतो. पण, सायली मात्र काहिशी लाजाळू असते. ती आपल्या मनातील भावना अर्जुनसमोर देखील व्यक्त करत नसते.

मात्र, आता अर्जुन एवढे दिवस ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे. सर्वांसमोर नाही पण, त्याच्या लाडक्या मिसेस सायली सुभेदार अर्जुनला एकांतात प्रपोज करणार आहेत. आपल्या बायकोचा हा रोमँटिक अंदाज पाहून अर्जुन भलताच खूश होतो तर, सायली गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाईलने “आयुष्यभर माझ्यावर असंच प्रेम करत राहा” असं नवऱ्याला सांगते.

अर्जुन गेल्या काही दिवसांपासून मधुभाऊ आणि वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये व्यग्र असतो. आपल्या वडिलांना निर्दोष ठरवण्यासाठी अर्जुन किती मेहनत घेतोय याची जाणीव सायलीला असते. त्यामुळेच ती अर्जुनसमोर मनातील भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेते.

गुलाबाचं फूल घेऊन ती अर्जुन समोर येते आणि म्हणते, “ए हिरो पलट…मै तेरे प्यार में पागल हो गयी हूं. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ये फूल सिर्फ तुम्हारे लिए, मेरा प्यार, मेरी मोहब्बत है… ये फूल. हमेशा के लिए मेरा रहेगा ना? जिंदगी भर मेरेसे प्यार करेगा ना? मेरा हाथ मरते दम तक पकड के रखेगा ना?”

सायलीचा हा रोमँटिक अंदाज पाहून अर्जुन भारावून जातो. तो सुद्धा बायकोसह गुडघ्यावर बसतो आणि तिच्या प्रपोजलवर “येस येस येस” असं उत्तर देऊन सायलीला मिठीत घेतो. आगामी भागात प्रेक्षकांना हा प्रपोजलचा सीन पाहायला मिळेल. प्रेक्षक सुद्धा हा प्रोमो पाहून खूश झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायली अर्जुनला करणार प्रपोज, पाहा…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता अर्जुनकडे असलेल्या पुराव्यांमुळे महिपतची पुन्हा एकदा कसून चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे मालिकेत काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका रात्री ८.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.