Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेचे हिरो-हिरोईन अर्जुन-सायली असले तरी यामधील खलनायकांच्या भूमिकांनी देखील प्रेक्षकांची कायम मनं जिंकून घेतली आहेत. प्रिया, साक्षी शिखरे, महिपत, नागराज यांच्या अभिनय शैलीचं देखील सर्वत्र कौतुक केलं जातं. या व्हिलन पात्रांचा सुद्धा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. मालिकेची नायिका सायली म्हणजेच जुई गडकरीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली या व्हिलन पात्रांच्या विरोधात कायम लढताना दिसते. हे झालं ऑनस्क्रीन…पण, या सगळ्या कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग नेमकं कसं आहे असा प्रश्न अनेकदा मालिकेच्या चाहत्यांच्या मनात निर्माण होतो. याबद्दलचा एक प्रश्न जुईला ‘आस्क मी सेशन’मध्ये विचारण्यात आला. “महिपतबरोरचा एखादा फोटो किंवा BTS व्हिडीओ शेअर करा” अशी विनंती जुईला चाहत्याने केली होती.

यावर जुईने एक खास फोटो शेअर केला. यामध्ये महिपत तुरुंगात दिसतोय…तर सायलीने गोड स्माइल करत त्याच्याबरोबर सेल्फी फोटो काढलाय. मालिकेत सायली-महिपत कितीही भांडले तरीही ऑफस्क्रीन यांच्या खूप छान बॉण्डिंग आहे. सायली त्यांना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मानते, म्हणून महिपतला ऑफस्क्रीन ती ‘दादा’ म्हणते. तर, महिपत तिला ‘चिमणे’ अशी हाक मारतात.

जुई लिहिते, ऑनस्क्रीन मालिकेत ते व्हिलन आहे…पण, ऑफस्क्रीन ते माझे ‘दादा’ आहेत; जे मला ‘चिमणे’ म्हणून हाक मारतात. तुम्हाला माहिती असेल की, ‘पुढचं पाऊल’ आणि ‘सरस्वती’ मालिकेत त्यांच्यामुळे मी साकारलेल्या पात्रांचा शेवट झाला होता. आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत सुद्धा त्यांनी सायलीला म्हणजेच तन्वीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, ही मालिका गेल्या साडेतीन वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याने आता सगळेच कलाकार ऑफस्क्रीन एकमेकांचे खूप घट्ट मित्र झाले आहेत. या सगळ्यांचं एकमेकांशी बॉण्डिंग इतकं छान आहे..त्यामुळेच काम करताना मजा येते आणि आमची मालिका आम्हा सगळ्यांच्या मेहनतीमुळे टीआरपी टॉपर आहे अशा भावना या मालिकेचे कलाकार विविध मुलाखतींमध्ये व्यक्त करत असतात.

jui ttm
जुई गडकरची पोस्ट

दरम्यान, आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाचं सगळं सत्य कधी बाहेर येणार आणि खरी तन्वी हीच सायली आहे हे सुभेदारांना केव्हा समजणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.