‘ठरलं तर मग’ मालिकेत साक्षी आता अर्जुन आणि चैतन्य विरोधात एक मोठं कारस्थान रचणार आहे. “प्रतिमाच्या निधनाची बातमी तुला कोणी दिली?” अशी विचारपूस साक्षीने केल्यावर चैतन्य तिच्यासमोर कल्पना मावशीचं नाव घेतो. परंतु, झोपेत फोनवर बोलताना कल्पना “मी चैतन्यला काहीच सांगितलेलं नाही” असं सांगते. यामुळे चैतन्यची मोठी कोंडी होते आणि तो अजूनही अर्जुनच्या संपर्कात असल्याबद्दल साक्षीची खात्री पटते. याशिवाय जेलमधला महिमत सुद्धा साक्षीला चैतन्यविरोधात सावध करतो.

अर्जुन आणि चैतन्यची कोंडी करण्यासाठी साक्षी नवा प्लॅन रचते. अर्जुन सुभेदारला खोटं सिद्ध करणं एवढं सोपं नाही याची पुरेपूर कल्पना साक्षीला असते. त्यामुळे यावेळी साक्षी अर्जुनला तोंडावर पाडण्यासाठी एक वेगळा प्लॅन रचते. पत्रकार परिषद बोलावून मीडियासमोर ती चैतन्य आणि अर्जुनने माझी फसवणूक केली असं सांगते. ही बातमी टीव्हीवर आल्यावर सर्वांनाच धक्का बसतो. सायली अन् अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते कारण, या सगळ्याचा थेट परिणाम मधुभाऊंच्या केसवर होणार असतो.

हेही वाचा : Video : “येऊ कशी प्रिया…”, आशा भोसलेंच्या जुन्या गाण्यावर थिरकली सोनाली कुलकर्णी; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

चैतन्य रागात या सगळ्याबद्दल साक्षीला जाब विचारायला जातो. तो रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेईल या विचाराने अर्जुन-सायली देखील त्याच्या मागोमाग जातात. तिकडे साक्षी अन् चैतन्यमध्ये टोकाचे वाद होतात. साक्षी चैतन्यला मारण्यासाठी कोणतीतरी वस्तू उचलणार तेवढ्यात अर्जुन सायली तिकडे पोहोचतात. यावेळी सायली साक्षीला चांगलेच खडेबोल सुनावते आणि लवकरत सत्य बाहेर येईल असं तिला ठणकावून सांगते.

दुसरीकडे साक्षीने केलेल्या गंभीर आरोपांचा परिणाम अर्जुनच्या कामकाजावर होणार आहे. आगामी भागात त्याच्या ऑफिसवर काही लोक येऊन हल्ला करणार आहेत. तसेच तुम्ही दोघे फसवे आहाता आमच्या सगळ्या केसेस परत द्या अशी मागणी हे लोक अर्जुनकडे करतात आणि त्याच्याकडच्या सगळ्या केसेस काढून घेतात असं आगामी प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. “आपल्याकडच्या सगळ्या केसेस गेल्या आता आपण काय करायचं?” असा प्रश्न चैतन्य अर्जुनला विचारतो. अर्जुन विचार करत असताना सायली तिकडे येते आणि सांगते, “तुमच्याकडे एक केस अजूनही बाकी आहे ती म्हणजे माझ्या मधुभाऊंची केस…सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमची केस नक्की सोडवाल आणि ही केस तुम्ही जिंकलात तर तुमच्याकडे सगळी कामं पुन्हा येतील”

हेही वाचा : राधिका मर्चंटने प्री-वेडिंगमध्ये नणंद ईशा अंबानीसह केलेला भन्नाट डान्स, क्रुझवरचे Inside फोटो आले समोर

सायलीने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे अर्जुनला धीर मिळतो आणि काही करून ही केस मी जिंकणारच असा निर्धार अर्जुन सुभेदार करतो. या दोघांच्या जोडीला चैतन्य असतोच! आता हे तिघेजण मिळून साक्षीला कसा धडा शिकवणार? आणि कोर्ट केसमध्ये पुढे काय होणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.