Marathi Serial TRP : दर आठवड्यात टीआरपीमध्ये कोणती मालिका बाजी मारणार याकडे प्रेक्षकांसह मालिकाविश्वातील सगळ्याच कलाकारांचं लक्ष असतं. गेली तीन वर्षे ‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ मालिका या टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेला पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेकिंग टीआरपी मिळतोय. सध्या या मालिकेत नागराजला धडा शिकवण्याचा ट्रॅक सुरू आहे. त्यामुळे प्रेक्षक आतुरतेने ही मालिका पाहतात.

‘ठरलं तर मग’ पाठोपाठ TRP च्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान असते अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. सुरुवातीला ही मालिका रात्री उशिरा प्रसारित केली जायची. मात्र, सिरियलची लोकप्रियता लक्षात घेता या मालिकेला प्राइम स्लॉट देण्यात आला आणि हा निर्णय यशस्वी ठरला. ‘तू ही रे माझा मितवा’ची वेळ बदलल्यापासून दर आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या स्थानी असते.

सध्या ‘नशीबवान’ आणि ‘कमळी’ या दोन मालिकांमध्ये दर आठवड्यात स्लॉट लीडर होण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. BARC इंडियाने नुकताच १७ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यानचा टीआरपी जाहीर केला आहे. यानुसार ‘नशीबवान’ मालिका ३.९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. तर, ‘कमळी’ ३.७ रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे.

याशिवाय शिवानी सोनारच्या ‘तारिणी’ मालिकेने टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली आहे. या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे गेले काही आठवडे ‘तारिणी’ साडेनऊच्या वाजताची स्लॉट लीडर सुद्धा ठरत आहे. तर, तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सहाव्या स्थानी आहे.

रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका ७:३० वाजता प्रसारित केली जायची. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मालिकेची वेळ बदलण्यात आली. ही मालिका आता रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाते. वेळ बदलल्यावर या मालिकेचा टीआरपी देखील कमी झाला आहे. साडेदहाच्या स्लॉटला ‘तुला जपणार आहे’ मालिकेला सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे. याशिवाय ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा टीआरपी देखील कमी झाला आहे.

मराठी मालिकांचा टीआरपी

  1. ठरलं तर मग – ४.९
  2. तू ही रे माझा मितवा – ४.१
  3. नशीबवान – ३.९
  4. कमळी – ३.७
  5. तारिणी – ३.६
    मी सावित्रीबाई जोतिराव फुले – ३.६
  6. लग्नानंतर होईलच प्रेम – ३.५
    वीण दोघांतली ही तुटेना – ३.५
  7. लक्ष्मी निवास – ३.३
  8. वचन दिले तू मला – ३.२
  9. देवमाणूस – ३.१
  10. तुझ्या सोबतीने – ३.०
  11. तुला जपणार आहे – २.५
  12. शुभ श्रावणी – २.४
  13. घरोघरी मातीच्या चुली – २.३

छोट्या पडद्यावर नव्याने सुरू झालेल्या मालिकांना सध्या अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये. ‘तुझ्या सोबतीने’, ‘शुभ श्रावणी’ या दोन्ही मालिका टॉप-१० मध्ये नाहीयेत. आता येत्या काही दिवसांत या मालिका टीआरपीच्या यादीत झेप घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.