Tharla Tar Mag Fame Kalpana And Asmita Dance Video : महाराष्ट्राला लोकगीतं व नाट्यसंगीताचा समृद्ध इतिहास व अमूल्य वारसा लाभला आहे. आजही प्रत्येक समारंभात ही लोकगीतं आवर्जून गायली जातात. गेल्या काही दिवसांपासून “ही फियाट गाडी माझी म्हणू का?” हे लोकगीत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांनी हे लोकगीत लिहिलं आहे. सध्या इन्स्टाग्राम रील्सवर या लोकगीताने धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनी सुद्धा या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवले आहेत.

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी या ट्रेंडिंग लोकगीतावर ठेका धरला होता. आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांना सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे. या मालिकेतील ऑनस्क्रीन मायलेकींच्या जोडीने सेटवरच्या मेकअप रूममध्ये या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील मायलेकीची जोडी म्हणजे कल्पना आणि अस्मिता. सिरियलमध्ये कल्पना ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी साकारत आहेत. तर, अस्मिता हे पात्र अभिनेत्री मोनिका दबाडे साकारतेय. या गाण्यावर हुबेहूब हूकस्टेप्स करत या दोघींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विशेष म्हणजे, कल्पना आणि अस्मिताच्या या डान्स व्हिडीओवर या मालिकेची खलनायिका श्वेता म्हणजे अभिनेत्री संचिता कुलकर्णीने खास कमेंट केली आहे. “खूप मस्त, पण कट्टी कट्टी कट्टी” अशी गोड कमेंट तिने या व्हिडीओवर केलीये.

दरम्यान, अन्य नेटकरी म्हणतात, “एव्हरग्रीन अभिनेत्री”, “सुपर Queens”, “मस्तच सुपर डान्स”, “जबरदस्त डान्स”, “एक नंबर ताई”, “जमलंय हा”, “आई आणि मुलगी…दोघीही छान डान्स करत आहेत”, “लय भारी कल्पना काकी आणि अस्मिता ताई”, “क्या बात आहे…आता म्हणा ट्रेंड डन”, “वॉव मस्त डान्स केलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.