Tharla Tar Mag & Gharoghari Matichya Chuli : छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांपासून ‘मालिकांचा महासंगम’ ही नवीन संकल्पना अस्तित्वात आल्याचं पाहायला मिळत आहे. या ‘महासंगम’मध्ये दोन मालिकांमधले कलाकार एकत्र येऊन काम करतात. याशिवाय मालिकेच्या कथानकात सुद्धा त्यानुसार ट्विस्ट आणले जातात.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सध्या या मालिका पाऊण तास प्रसारित केल्या जात आहेत.
मात्र, आता येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळेलं. सायंकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण दीड तास ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा महासंगम पार पडणार आहे.
आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी जानकी आणि सायली एकत्र येणार आहेत. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. मधुभाऊंना रस्त्यावर एक ट्रक जाणूनबुजून धडक देणार असतो तेवढ्यात जानकी वेळीच तिथे पोहोचते आणि मधुभाऊंचं रक्षण करते. यानंतर सायली पुढील काही दिवस मधुभाऊंना तुझ्याकडे ठेव, जेणेकरून आम्हाला केससंदर्भात अन्य पुरावे गोळा करण्यात येतील अशी मदत जानकीकडे मागते.
जानकी सुद्धा सायलीला मदत करण्यास तयार होते. तुम्ही निर्धास्तपणे केस लढा. मधुभाऊंसाठी आम्ही आहोत असा विश्वास जानकी-हृषिकेश अर्जुन-सायलीला देतात. हे सगळं ऐश्वर्या गुपचूप ऐकते आणि ती पुढे जाऊन कट रचणार असा अंदाज प्रेक्षक बांधणार…तोवर सायली आणि जानकी ऐश्वर्यासमोर येऊन उभ्या राहतात. तू कोणताही खोटेपणा केलास तर आम्ही आहोतच अशी ताकीद या दोघी ऐश्वर्याला देतात असं या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सायली-जानकीला एकत्र पाहून ऐश्वर्या सुद्धा चक्रावून जाते. आता ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन्ही मालिकांचे महासंगम येत्या १० मार्चपासून ते १६ मार्चपर्यंत पार पडणार आहेत. आता या सात दिवसांच्या काळात मालिकेत कोणते ट्विस्ट येणार? मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुनला आणखी कोणता पुरावा मिळणार? जानकी-सायली मिळून ऐश्वर्या व अन्य खलनायकांना कशी अद्दल घडवणार? या सगळ्या गोष्टी मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.