मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत तिनं साकारलेली सायली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे 'ठरलं तर मग' मालिका देखील लोकप्रियतेच्या शिखरावर अल्पावधीतच पोहोचली आहे. अशातच सायली म्हणजे जुईनं तिचं सुख नक्की कशात आहे? याचा खुलासा केला आहे. हेही वाचा - अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. इतर कलाकारप्रमाणे तिच्याही घरी काल गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे ती सध्या बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात व्यस्त आहे. सोशल मीडियावर बाप्पाबरोबर बरेच फोटो तिनं शेअर केले आहेत. हेही वाचा – लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर दुर्दैवी घटना; लाइटमनचा विजेच्या झटक्याने मृत्यू नुकतीच जुईनं एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आराम करताना दिसत आहे. या स्टोरीमध्ये तिनं लिहीलं आहे की, "सुख= आपल्या गच्चीवर एकत्र जेवण आणि मग नुसत्या गप्पा आणि आराम." यामध्ये जुईचं सुख आहे. हेही वाचा – Video: “जेलमध्ये जाऊन आला तरी सुधारला नाही” राज कुंद्रा आणि ईशा गुप्ताच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरने रश्मिका मंदानाला केलं इग्नॉर?; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूडमधील लोकांना जास्त अहंकार…” दरम्यान, 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या अर्जुन आणि सायलीमधील नातं आणखी दृढ होताना पाहायला मिळत आहे. अर्जुनला सायली आवडू लागली आहे. हरतालिकेच्या निमित्तानं सायली आता कडक उपवास करताना पाहायला मिळणार आहे.