‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. मराठीतील नंबर वन असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. शिवाय या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगला खिळवून ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव झळकली होती. याच रुचिराने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आई-वडिलांना खास सरप्राइज दिलं.

काल (१० मे) अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बऱ्याच कलाकारांनी नवं घर, नवी गाडी खरेदी केली. त्याप्रमाणेच ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री रुचिरा जाधवने आई-वडिलांना खास सरप्राइज देण्यासाठी आलिशान गाडी खरेदी केली. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका बंद करा म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं चोख उत्तर, म्हणाल्या, “मालिकेवर १०० कुटुंब…”

आलिशान गाडीबरोबर फोटो शेअर करत रुचिराने लिहिलं आहे, “अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा. माझ्या सुवर्थरथाचं राजेच्या (रुचिरा जाधव) विश्वात स्वागत करत आहे. या सुवर्ण दिवशी आई-वडिलांसाठी खास सरप्राइज.” अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आलिशान गाडी पाहायला मिळत आहे. शिवाय फोटोत आई-वडील, बहीण देखील दिसत आहे. गाडीवरील राधा-कृष्णाच्या प्रतिमेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा- Video: अज्या परत आला! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेतून नितीश चव्हाण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा दमदार प्रोमो

रुचिराच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अभिनंदन”, “तुझा खूप अभिमान आहे”, “रुचिरा तुझं अभिनंदन नवी गाडी घेतल्याबद्दल. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. अजून एक स्वप्न तू पूर्ण केलंस”, अशा अनेक प्रतिक्रिया रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “मला वाईट वाटतंय…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची अमोल कोल्हेंच्या अभिनय क्षेत्रातील ब्रेकविषयी प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान, रुचिराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकली होती. तसेच यापूर्वी ती ‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती. या मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती; जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. काही दिवसांपूर्वी रुचिरा ‘ठरलं तर मग’ मालिकेत छोट्या भूमिकेत झळकली. तिने अर्जुन सुभेदारच्या मैत्रीणीची भूमिका निभावली होती.