अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका ही सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जुई आणि अमितनं निभावलेली सायली-अर्जुनची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील मालिकेवर भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. नुकताच अर्जुन म्हणजे अमितनं एक सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये “तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं” असं जुई म्हणताना दिसत आहे. नेमकं दोघांमध्ये काय घडलंय? जाणून घ्या…
हेही वाचा – महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातील…”
जुई आणि अमित दोघं सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या माध्यमातून देखील ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्याचं मनोरंजन करत असतात. नुकताच अमितनं “बिचारा नवरा आणि हुशार बायको” लिहीतं एक मजेशीर रिक्रिएट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जुई म्हणते की, “तू मला किती त्रास देतो यार? तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं.” यावर अमित म्हणतो की, “असं कसं बोलतेस वेडी? तुझं लग्न राक्षसाबरोबर कसं काय झालं असतं? रक्ताच्या नात्यांमध्ये लग्न होतं नाहीत…”
अशा या मजेशीर व्हिडीओवर दोघांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी हसण्याचे इमोजी टाकले आहेत, तर कोणी दोघांना बेस्ट कपल म्हटलं आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता गणपती विसर्जना दरम्यान एक दुदैवी घटना घडताना पाहायला मिळणार आहे. सायलीवर हल्ला होणार आहे. पण हा हल्ला अर्जुन-सायलीच्या नात्याला कोणतं नवं वळण देईल? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.