scorecardresearch

Premium

“…म्हणून माझा भाऊ मला म्हणतो घंटागाडी”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितली टोपण नावाची यादी

अभिनेत्री जुई गडकरीची टोपण नावं जाणून घ्या…

tharla tar mag fame jui gadkari
अभिनेत्री जुई गडकरीची टोपण नावं जाणून घ्या…

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी सध्या मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तिनं साकारलेल्या सायली या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शिवाय जुईची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीला बऱ्याच टोपण नावांनी हाक मारली जाते. याचा खुलासा तिनं स्वतः केला आहे.

हेही वाचा – Sindhutai Maazi Maai: लवकरच मोठी चिंधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?; ‘ही’ अभिनेत्री सिंधुताईंच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

maharashtrachi hasyajatra fame nikhil bane and gaurav more
“अजिबात टेन्शन नको घेऊस”, ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला ‘बॉईज ४’च्या सेटवर गौरव मोरेनं केली ‘अशी’ मदत
marathi singer actress Ketaki Mategaonkar
केतकी माटेगावकरची आहेत मजेशीर टोपण नावं; अभिनेत्री म्हणाली…
marathi singer actress Ketaki Mategaonkar
“मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
Madhurani prabhulkar with her daughter
आईप्रमाणे मुलगीही टॅलेंटेड! मधुराणी प्रभुलकरची लेक बसवतेय नाटक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा – “…असं कोण करत?”; गिरीजा ओकने सांगितला शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला त्याने…”

‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी बोलताना अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या टोपण नावांचा खुलासा केला. तारांगणच्या स्लॅमबुकच्या पाचव्या भागात जुई टोपण नावांविषयी बोलली. जुई म्हणाली की, “मला घरामध्ये जुया म्हणतात. मित्र-मैत्रीणी देखील जुया नावाने हाक मारतात. माझी आई मला मिनू म्हणते. तर माझ्या गायनाच्या शिक्षिका सुप्रिया महाजन त्या मला, झुमा, जुडा अशी हाक मारतात. तसेच माझ्या भावाने मला घंटागाडी असं नाव दिलं आहे. कारण मी सतत साफसफाई करत असते म्हणून त्यानं माझं नाव मोबाइलमध्येही घंटागाडी असं सेव्ह केलं आहे.”

हेही वाचा – ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे शाहरुख खानचा ‘डंकी’? सोशल मीडियावर होतोय ट्रोल

दरम्यान, जुईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेनंतर ती ‘वर्तुळ’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर जुई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली. या पर्वात तिच्याबरोबर ‘पुढचं पाऊल’मध्ये सोहमच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता आस्ताद काळेसुद्धा झळकला होता. ‘बिग बॉस’ नंतर काही काळ्याच्या विश्रांतीने जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जबरदस्त पुनरागमन केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharla tar mag fame jui gadkari nickname pps

First published on: 01-10-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×