अभिनेत्री जुई गडकरी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. जुईने या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण अभिनयात करिअर करण्याशिवाय जुईच आणखी एक स्वप्न आहे. नुकतचं एका मुलाखतीत जुईने आपल्या स्वप्नाबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- “माझ्यामुळे आदित्य ठाकरेचं…”, अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “त्याच्या विरोधात…”

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

जुई म्हणाली, मला पुढे स्वत: मराठमोळं रेस्टॉरंट काढायचं आहे. जगभरात त्याच्या अनेक शाखा काढण्याची माझी इच्छा आहे. कारण भारताबाहेर गेल्यावर आपल्या मराठमोळं जेवण करण्याची इच्छा होते. त्यामुळे परदेशातही मराठमोळं रेस्टॉरंट काढण्याची माझी ही इच्छा आहे. माझ्या रेस्टॉरंटची चेन जगात सगळीकडे असेल.”

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत जुईने तिच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला होता. ‘हंच मीडिया’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना जुईचं खऱ्या आयुष्यात लग्न कधी होणार? याचा खुलासा अभिनेता अमित भानुशालीने केला होता. अमितला जुईच्या लग्नाची तारीख काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने २४ फेब्रुवारी २०२४ असं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा- Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…

पण, अमितने सांगितलेली तारीख दुरुस्त करत जुई म्हणाली, “अमित थोडासा चुकलाय कारण, लग्नाची तारीख ४ आहे… महिना फेब्रुवारीचं असेल. यंदा माझा व्हॅलेंटाईन डे जरा चांगला साजरा होणार आहे.” यामुळेच जुईचं लग्न ४ फेब्रुवारी २०२४ होणार ही चर्चा सर्वत्र होऊ लागली. पण आता अभिनेत्रीने स्पष्टच बोलून या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.