‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली अर्थात अभिनेत्री जुई गडकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचं लग्न ठरल्याच्या वावड्या उठल्या होत्या. ४ फेब्रुवारी २०२४ जुई लग्नबंधनात अडकणार असल्याचं पसरलं होतं. पण आजवर तिनं ज्या मालिकांमध्ये काम केलंय त्या मालिकांमध्ये तिचं लग्न ४ फेब्रुवारीला झाल्यामुळे सगळेजण तिला असं चिडवतात, असं जुईनं सांगून या चर्चांना पूर्ण विराम दिला. अशा या चर्चत असणाऱ्या जुईकडे काही दिवसांपूर्वी मात्र एक वाईट गोष्ट घडली होती. हा प्रसंग तिनं नुकत्याच एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधताना सांगितला.

हेही वाचा – Bigg Boss 17: टेलीव्हिजनवरील ‘हा’ लोकप्रिय चेहरा बिग बॉसच्या १७व्या पर्वासाठी निश्चित; कधीपासून सुरू होणार जाणून घ्या

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

जुई गडकरीच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा विराजमान झाला होता. काल जुईनं लाडक्या बाप्पाला निरोप दिला. “पुढच्या वर्षी लवकर ये…आणि यावर्षी मी जे मागितलंय ते तु नक्की पूर्ण करशीलच,” असं लिहीतं तिनं बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, पहिला फोटो आला समोर

बाप्पाच्या निमित्तानं जुईनं नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. त्यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘बाप्पाने तुला आयुष्यातला एक दिवस काढून टाकण्याची संधी दिली तर कोणता दिवस काढून टाकशील.’ यावर जुई म्हणाली की, “असं फार मागत नाही मी, कारण प्रत्येक दिवस काहींना काहीतरी मला शिकवण देऊन जातो. पण चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली. सगळ्यांना माहितेय माझ्याकडे आठ मांजरी आहेत. माझी ही बाळ. त्यातली एक चार दिवसांपूर्वी गेली. गेले चार महिने ती खूप गंभीर आजारात होती. हळूहळू रिकव्हर होत होती. आमच्या छकुलीला किडनी सिस्ट झाला होता. नंतर तिची इतकी परिस्थिती वाईट होती की, बाबा तिला रोज सलाईन लावायचे. तिला रोज जेवू घालायचे. पण नंतर ती स्वतः खायला लागली. रिकव्हर होत होती.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं सुख कशात आहे माहितेय? जाणून घ्या

“मात्र तिला अचानक कार्डियक अरेस्ट आला. मी तिला भेटायला येऊ देखील शकले नाही. कारण दुसऱ्या दिवशी माझा साडेसहाचा मडला कॉलटाइम होता. मी आदल्या रात्री तिच्याशी साडे अकराला व्हिडीओ कॉलवर बोलले. ती मला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होती, पण रात्री एक वाजता तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले. मी आयुष्यातून हा दिवस काढून टाकेल. नकोच हा दिवस, कारण मी माझ्या बाळांच्या बाबतीत असा विचार करू शकत नाही,” असं जुई म्हणाली.