scorecardresearch

“मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी असं म्हणाली? जाणून घ्या…

अभिनेत्री जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

Tharla tar mag fame jui gadkari
अभिनेत्री जुई गडकरीच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

मराठी मालिकाविश्वातील लाडक्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या दमदार अभिनयाने मालिकाविश्वात एक वेगळी छाप उमटवली आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिनं या मालिकेत सोज्वळ अन् साधीभोळी सायली साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण अशा या लोकप्रिय अभिनेत्रीचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. “मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही”, असं जुई म्हणाली आहे. पण जुई असं का म्हणाली जाणून घ्या?

हेही वाचा – Shark Tank India Season 3: शार्क टँकच्या आगामी पर्वात होणार बदल; नव्या परीक्षकाची होणार एन्ट्री, जाणून घ्या

Tuzech Mi Geet Gaat Aahe fame Tejaswini Lonari
‘बिग बॉस’च्या आठवणीत रमली ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारी, म्हणाली, “मैलाच्या दगडासारखा…”
Marathi actor Adish Vaidya entry in Kavyanjali
Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ
tharla tar mag fame actress jui gadkari
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं सुख कशात आहे माहितेय? जाणून घ्या
arjun kapoor
“तुझी नेहमी आठवण येत राहील”; अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. मालिकेतील अपडेट देखील देत असते. एवढंच नाही तर जुई प्रत्येक घडामोडींवर परखड मत व्यक्त करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘ठरलं तर मग’ मालिकेतील एक सीन दाखवत आहे. या सीनमध्ये दिसलेली जुई तिला खूप आवडल्याचं ती सांगत आहे. या व्हिडीओवर जुईनं लिहीलं आहे की, “मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही. पण या सिक्वेंसमध्ये मी जशी दिसले आहे ते मला खूप आवडलं.”

तसेच हा व्हिडीओ शेअर करत जुईने लिहीलं आहे की, “हा सिक्वेंस ज्या पद्धतीने शूट केला ते मला खूप आवडलं. सुंदर आणि फ्रेश सिक्वेंस वाटला. डिओपी रमेश सिंग आणि आमचे दिग्दर्शक सचिन गोखले सर यांचे आभार.

हेही वाचा – Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ

हेही वाचा – Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

दरम्यान, सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर महिपत आणि नागराजने पाठवलेल्या गुंडांनी हल्ला केला आहे. यामुळे सध्या सायलीची प्रकृती गंभीर असून तिला ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाची आवश्यकता आहे. परंतु, कोणाचाही रक्तगट सायलीच्या रक्तगटाशी जुळत नाहीये. त्यामुळे अशा कठीण प्रसंगातून सायली कशी बाहेर येईल? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharla tar mag fame jui gadkari these social media post viral pps

First published on: 03-10-2023 at 17:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×