Monika Dabade advice to womens: मालिकेत दिसणारे कलाकार चाहत्यांबरोबर जोडलेले असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. मनोरंजनाबरोबरच अगदी कोणत्या पद्धतीने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, आहारात कोणते पदार्थ असायला हवेत, कोणत्या पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे, अशा अनेक गोष्टींबद्दल कलाकार सांगत असतात.

आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील मोनिका दबडेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिलांना सल्ला दिला आहे. तो सल्ला नेमका काय आहे, याबद्दल जाणून घेऊ…

“माझ्याकडे ज्या सप्लिमेंट्स आहेत, त्या…”

मोनिकाने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कोणत्या सप्लिमेंट्स घेते याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “सप्लिमेंट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी सकाळी घेतल्या आहेत. कारण- प्रेग्नन्सीनंतर शरीरात काही कमतरता निर्माण होतात. कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी आणि आयर्न अशा गोष्टींबद्दल बायकांनी काळजी घेतली पाहिजे . ब्लड टेस्ट केल्यानंतर रिपोर्टमध्ये जर आलं की काही कमतरता आहे, तर त्यावर काम करा.”

पुढे ती म्हणाली, “माझ्याकडे ज्या सप्लिमेंट्स आहेत, त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या आहेत. पण, तुम्ही थेट मेडिकलमधूनही घेऊ शकता. तुम्ही त्यांना सांगितलं की सप्लिमेंट्स हव्या आहेत, जसं आपण व्हिटॅमिन डी किंवा ईच्या गोळ्या घेतो, तसंच हेही आहे. पण, हे मला माझ्या डॉक्टरांनी दिलेलं आहे. आयर्न, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी केस, चेहऱ्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रेग्नन्सीनंतर माझ्यात हिमोग्लोबीनची कमतरता होती, त्यामुळे मी आयर्नची सप्लिमेंट्स घेते.”

याबरोबरच, मोनिका दबडेने याच मुलाखतीत ती मेकअपसाठी काय वापरते, तिच्या मेकअपच्या बॅगेत काय असते, याबद्दलही सांगितले. मोनिका सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. ती विविध पदार्थांच्या रेसिपी चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या या व्हिडीओंना चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. मोनिकाच्या पतीच्या चिन्मयच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंनादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याची सांगण्याची पद्धत, शब्दरचना याचा मोठा चाहतावर्ग आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोनिका अस्मिता या भूमिकेत दिसत आहे. तिची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील सायली व अर्जुन यांच्या आयुष्यात सतत काही ना काही घडत असते. सतत ट्विस्ट येत असतात. आता आगामी काळात मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.