स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. मागील दीड वर्ष या मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीत आपलं अव्वल स्थान राखून ठेवलंय. अर्जुन-सायलीच्या पात्रानंदेखील प्रेक्षकांना भुरळ घालतीय.

आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. सध्या मालिकेत एकीकडे अर्जुन-सायली बाळाचा विचार करतायत या कल्पनेनं अर्जुनच्या आईला आनंद झालाय. तर हा गैरसमज कसा दूर करणार याच्या विचारत अर्जुन-सायली पडले आहेत. तर, दुसरीकडे प्रतिमा या जगातच नाहीय हे रविराजला पटवून देण्याच्या तयारीत प्रिया आहे.

हेही वाचा… २६ वर्षांपूर्वीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर थिरकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब; डान्सर रुपेश बनेने दिली साथ, व्हिडीओ व्हायरल

आता मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या प्रोमोमध्ये रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालताना दिसतोय. याचाच अर्थ प्रियाचं कारस्थान यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. प्रतिमाचा मृत्यू झालाय आणि ती सगळ्यांना सोडून देवाघरी गेलीय हे कळल्यावर सुभेदार कुटुंब रविराजच्या घरी त्याला भेटायला जातं. तितक्यात तिथे सायली येते. सायली येताच पूर्णाआजी तिला प्रतिमा, अशी हाक मारते. माझी प्रतिमा म्हणत तिला जवळ घेते. कारण- सायली प्रतिमाची साडी नेसून आलेली असते. इतक्यात प्रिया तिच्या हाताला घट्ट धरून म्हणते, “तू आताच्या आता माझ्या आईची साडी बदल; नाही तर….”

हेही वाचा… “तिला नीट उभं राहता…”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली कतरिना कैफच्या करिअरच्या सुरूवातीची आठवण

तेवढ्यात पूर्णाआजी प्रियाला म्हणते, “थांब तन्वी. हिच्या रूपात मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. तो हार फोटोला नको घालू या.” हे ऐकताच सायलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात; मात्र प्रियाला याचा धक्का बसतो.

प्रिया ऊर्फ तन्वीनं कसबसं रविराजला हे पटवून दिलेलं असतं की, प्रतिमा आता या जगात नाहीय. यासाठी तिने रुग्णालयातून प्रतिमासारख्या दिसणाऱ्या खोट्या मृतदेहाचीदेखील व्यवस्था केलेली असते. आता पूर्णाआजीनं सांगितल्यावर रविराज प्रतिमाचा शोध सुरू ठेवणार की लेक तन्वीचं ऐकून प्रतिमाला मृत घोषित करणार ते येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.

हेही वाचा… कलरफुल पूजा सावंतला पडली ‘गुलाबी साडी’ या गाण्याची भुरळ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, या मालिकेत लवकरच नवीन ट्विस्ट येणार आहे. अर्जुन, सायली व चैतन्य हे साक्षीविरोधात आणखी पुरावे शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लवकरच मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल, असं प्रेक्षकांना वाटतंय.